चंद्रपुरात तापमान केंद्राची दयनिय अवस्था

आठवडाभरापासून चंद्रपूर शहराच्या तापमानात वाढ होत चाललीय. ४५ अंशांपेक्षा हे तापमान जास्त असल्याचं नागरिक सांगतायत. कारण ज्या केंद्रात तापमानाची नोंद केली जातेय, त्या केंद्राची दुर्दशा झालीय. 

Updated: May 21, 2016, 09:56 PM IST
चंद्रपुरात तापमान केंद्राची दयनिय अवस्था   title=

चंद्रपूर : आठवडाभरापासून चंद्रपूर शहराच्या तापमानात वाढ होत चाललीय. ४५ अंशांपेक्षा हे तापमान जास्त असल्याचं नागरिक सांगतायत. कारण ज्या केंद्रात तापमानाची नोंद केली जातेय, त्या केंद्राची दुर्दशा झालीय. 

ही इमारत गर्दीत हरवलीय. त्यामुळं या इमारतीत अचूक तापमान नोंदलंच जात नसल्याचं सांगितलं जातंय.  शहराच्या तुकुम भागात असलेली ही ऑब्झर्व्हेटरी... नियमानुसार हवामान नोंदणी केंद्राच्या सुमारे २०० मीटर परिसरात शेतीही कसली जाता कामा नये. पण चंद्रपूर शहरातली ऑब्झर्व्हेटरी तर इमारतींच्या जंगलात हरवलीय. 

येवढंच नाही तर इथली यंत्रसामुग्रीही मोडकळीला आलीय. तापमान, पाऊस, वा-याचा वेग- दिशा या नोंदींवर ऑब्झर्व्हेटरीच्या आसपास असलेल्या अतिक्रमणाचा परिणाम होतोय. त्यामुळं इथलं तापमान अचूक नोंदलं जात असेल यावर तज्ज्ञांकडून शंका व्यक्त केली जातेय.