पुणे : चहावाला, सीए आणि आता ब्रॅण्ड अॅम्बेसिडर.. होय ही एखादी कल्पना नसून सत्य आहे...पुण्याच्या सोमनाथ गिरामनेनं हा अविश्वसनीय असा प्रवास केलाय. व्यवसायाने चहावाला असणा-या सोमनाथनं सीएच्या परिक्षेत यश मिळवुन तरुणांपुढे एक आदर्श ठेवलाय.
महाराष्ट्र शासनाने देखील त्याच्या या मेहनतीची दखल घेत त्याला, कमवा आणि शिका या योजनेचा ब्रॅण्ड अँम्बेसिडर बनवलयं.. त्यामुळे एका चहावाल्याला आता ब्रँड अँम्बँसिटर अशी ओळख मिळणार आहे.
मुळचा सोलापुर जिल्हयातील करमाळा येथील हा तरुण 2006 साली शिकण्यासाठी पुण्यामध्ये आला... शेतकरी कुटुंबातून आलेल्या सोमनाथला घरच्या परिस्थितिमुळे शिकता शिकता अर्थार्जन करणही महत्त्वाचं होतं. चहाची टपरी टाकण्याचा निर्णय त्याने घेतला. एकीकडे चहाची टपरी आणि दुसरीकडे सीएची तयारी अशी दुहेरी लढाई लढणा-या सोमनाथला सीए च्या परिक्षेत यश मिळालं आणि त्याच्या कष्टांचं चीज झालं.
राज्य शासनाने त्याला कमवा आणि शिका योजनेचा ब्रॅण्ड अँम्बँसिटर बनवल्याने त्याच्या मेहनतीला फळ तर मिळालचं परंतु त्याच्या सारख्या हजारो तरुणांना कठीण परिस्थितिमध्ये लढण्यासाठी प्रोत्साहन मिळालयं.