नाशिक : कसारा घाट आणि इगतपुरीनजीक रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळली. आज पहाटेची ही घटना आहे.
रेल्वेकडून ढिगाराबाजूला करण्याचं काम लवकरच पूर्ण होणार आहे. मात्र यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीची वाट लागली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
इतपुरीनजीक दरड कोसळल्याने, पाटणा एलटीटी आणि हावडा दुरान्तो खोळंबली होती. तसेच कसारा नजीक ट्रॅकवर दरड कोसळल्याने भुसावळ-मुंबई पँसेंजर आणि मनमाड-कुर्ला गोदावरी एक्सप्रेस या गाड्या मनमाडला परत पाठवण्यात आल्या आहेत.
तसेच राजेंद्रनगर, हावडा-मुंबई, महानगरी आणि गोदान एक्सप्रेस या पुण्यामार्गे मुंबईला रवाना करण्यात आल्या आहेत. दरड कोसळल्यानंतर माती बाजूला करण्याचं काम सुरु असल्याने, इतरही अनेक गाड्या उशिरानं धावत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.