रत्नागिरीत थिबा राजाचा शंभरावा स्मृती दिन साजरा

ब्रम्हदेशचा अर्थात म्यानमारचा शेवटचे राजे थिबा यांचा आज शंभरावा स्मृती दिन आहे. आपल्या शेवटच्या राजाला अभिवादन करण्यासाठी आज रत्नागिरीत म्यानमारच्या अनेक दिग्गजांनी रत्नागिरीत हजेरी लावली.

Updated: Dec 17, 2016, 03:39 PM IST
रत्नागिरीत थिबा राजाचा शंभरावा स्मृती दिन साजरा title=

रत्नागिरी : ब्रम्हदेशचा अर्थात म्यानमारचा शेवटचे राजे थिबा यांचा आज शंभरावा स्मृती दिन आहे. आपल्या शेवटच्या राजाला अभिवादन करण्यासाठी आज रत्नागिरीत म्यानमारच्या अनेक दिग्गजांनी रत्नागिरीत हजेरी लावली.

ब्रम्हदेश अर्थात म्यानमारचे उपराष्ट्रपती यू मॅन्ट स्यू, लष्कर प्रमुख मीन हाँग अलाइंन आणि थिबा राजाचे म्यानमारमधील वंशंज यू सो वीन यांनी रत्नागिरीतल्या थिबा राज्याच्या समाधीला अभिवादन केलं. यांच्यासोबत म्यानमारमधून आलेल्या 55  भिक्षूगणांनी थिबाराज्याच्या समाधीस्थळी धार्मिक विधी केले. 

ब्राम्ही भाषेत समाधीस्थळी हे कार्यक्रम करण्यात आले. त्यानंतर म्यानमारचे उपराष्ट्रपती, लष्कर प्रमुख आणि थिबा राजाच्या वंशजांनी थिबा राजवाड्याला भेट दिली. या पुण्य़तीथीच्या निमित्ताने थिबा राजाचे रत्नागिरीतील आणि म्यानमारमधील वंशज एकत्र आले. थेट खापरपणतूपासून सर्व कुटुंबीय एकत्र येत सर्वांनी भोजन केले.