वैद्यनाथ बँक रोकड प्रकरणी औरंगाबादच्या हॉस्पिटलची चौकशी

बीडमधल्या परळीतल्या वैद्यनाथ बँक 10 कोटी प्रकरणात शुक्रवारी सीबीआयनं अनेक ठिकाणी छापे टाकले.

Updated: Dec 24, 2016, 11:51 PM IST
वैद्यनाथ बँक रोकड प्रकरणी औरंगाबादच्या हॉस्पिटलची चौकशी  title=

औरंगाबाद : बीडमधल्या परळीतल्या वैद्यनाथ बँक 10 कोटी प्रकरणात शुक्रवारी सीबीआयनं अनेक ठिकाणी छापे टाकले. त्यात औरंबादमधल्या सिग्मा हॉस्पिटलचीही चौकशी करण्यात आली. सिग्मा हॉस्पिटलनं मात्र त्यांच्यावरचे आरोप फेटाळून लावले आहेत. 

हॉस्पिटलनं 12 नोव्हेंबरला 2 कोटी कर्जापोटी भरले आहेत. त्याची पावती आपल्याकडे आहे. बँक स्टेटमेंटमध्ये सुद्धा ते दिसत असल्याचं सिग्मा हॉस्पिटलनं सांगितलंय. त्याचे पुरावे सुद्धा सीबीआयला दिले असल्याचं सिग्मा हॉस्पिटल प्रशासनानं स्पष्ट केलंय.