बविआला सर्वच राजकीय पक्षांनी मदत केली : हितेंद्र ठाकूर

आम्ही १०६ जिंकल्या हे आमचे यश आहे. मात्र, या निवडणुकीत भाजपने नाहीतर सर्वच पक्षांनी मदत केली, असा गौप्यस्फोट बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकून यांनी केलाय.

Updated: Jun 17, 2015, 03:29 PM IST
बविआला सर्वच राजकीय पक्षांनी मदत केली : हितेंद्र ठाकूर title=

पालघर : आम्ही १०६ जिंकल्या हे आमचे यश आहे. मात्र, या निवडणुकीत भाजपने नाहीतर सर्वच पक्षांनी मदत केली, असा गौप्यस्फोट बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकून यांनी केलाय.

वसई विरार महानगर पालिकेच्या निकालात बहुजन विकास आघाडीने एकहाती बाजी मारली आहे. ११५ पैकी त्यांच्या १०६ जागा निवडून आल्या आहेत, तर सेना ५, भाजपा १ व अपक्षांना ३ जागा मिळाल्यात. या निवडणुकीत आम्हला भाजपाने आतून मदत केलीय असे आरोप होत होते तर आम्ही म्हणतो आम्हला भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, रिपाईं या सर्वच पक्षांनी मदत केलीय, असा धक्कादायक खुलासा हितेंद्र ठाकूर यांनी केला.

यावर हे सर्व आरोप बिनबुडाचे असून या निवडणुकीच्या प्रक्रियेवर शंका व्यक्त करत याची चौकशी व्हावी, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आलीय. त्यामुळे निवडणुकीनंतरही बहुजन विकास आघाडी विरोधात शिवसेना हा सामना पुन्हा रंगताना दिसत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.