विष प्यायलेल्या जोडप्यावर तलवार-कोयत्यानं हल्ला!

मुलीने प्रियकराबरोबर विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय, अशी हे समजल्यानंतर समाजात आपली प्रतिष्ठा धुळीला मिळाली, अशा टोकाच्या विचारामुळे बीड जिल्ह्यात रक्तरंजित घडलाय. मुलीच्या भावानं आणि काकाने रुग्णालयात जाऊन मुलीवर आणि तिच्या प्रियकरावर तलवार आणि कोयत्यानं वार केल्याची घटना घडलीय.

Updated: Dec 24, 2014, 04:06 PM IST
विष प्यायलेल्या जोडप्यावर तलवार-कोयत्यानं हल्ला! title=
प्रातिनिधिक फोटो

बीड : मुलीने प्रियकराबरोबर विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय, अशी हे समजल्यानंतर समाजात आपली प्रतिष्ठा धुळीला मिळाली, अशा टोकाच्या विचारामुळे बीड जिल्ह्यात रक्तरंजित घडलाय. मुलीच्या भावानं आणि काकाने रुग्णालयात जाऊन मुलीवर आणि तिच्या प्रियकरावर तलवार आणि कोयत्यानं वार केल्याची घटना घडलीय.

२० वर्षांची सुषमा (नाव बदलले आहे) आणि २३ वर्षांचा दशरथ सुभाष कुडके या दोघांचे गेल्या दीड वर्षापासून प्रेमसंबंध होते. वर संशोधनासाठी तिचे वडील मंगळवारी औरंगाबादला गेल्यामुळे सकाळपासूनच ती अस्वस्थ होती. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास तिने दशरथला भेटण्यासाठी बोलावले. नाळवंडी परिसरातील शिवारात दोघेही दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान भेटले. यावेळी तिने वरसंशोधन सुरू असल्याची माहिती दिल्यानंतर तोही अस्वस्थ झाला.

पण, कुणाशी चर्चा करून या प्रश्नावर उत्तर काढण्याऐवजी या प्रेमी युगुलानं विषारी औषध पिऊन आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. सुषमानं आपल्या आईला फोन करून आपण विष घेऊन आत्महत्या करत असल्याची माहितीही दिली. दशरथनंही आपल्या मामाला आणि त्याचा मित्र जग्गू चव्हाणला विष घेतल्याचं कळवलं. जग्गू तातडीनं आपल्या काही मित्रांना घेऊन तेथे पोहोचला. त्यांनी या युगुलाला तातडीने शहरातील एका खासगी रूग्णालयात दाखल केले. 

या घटनेची माहिती सुषमाचा भाऊ सोनू (२६) व चुलता दामू (३६) यांना समजल्यानंतर सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान त्या दोघांनीही रूग्णालयाकडे धाव घेतली... प्रचंड संतापलेल्या भावानं आणि काकानं रागातच रुग्णालय सोडलं... आणि काही वेळातच, हे दोघेही तलवार आणि कोयत्यासह रुग्णालयात दाखल झाले... आणि बेडवर उपचार घेणार्या  दोघांवरही या दोघांनी तलवार व कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात सुषमा आणि दशरथ गंभीर जखमी झालेत.

अचानक घडलेल्या या घटनेमुळे रूग्णालयात एकच गोंधळ उडाला. रूग्णालयातील लोक धावले आणि त्यांनी या दोघांना थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, या दोघांनी स्वत:च शहर पोलीस गाठलं... पोलिसांनी या दोघांनाही अटक केलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.