काटोल आणि नरखेडमध्ये भाजपला मोठा हादरा

नागपूरमध्ये झालेल्या नऊ नगरपालिकांमध्ये भाजपला आतापर्यंत जाहीर झालेल्या नगरपालिकांच्या निकालात भाजपनं आघाडी घेतलीय. 

Updated: Jan 9, 2017, 02:56 PM IST
काटोल आणि नरखेडमध्ये भाजपला मोठा हादरा title=

नागपूर : नागपूरमध्ये झालेल्या नऊ नगरपालिकांमध्ये भाजपला आतापर्यंत जाहीर झालेल्या नगरपालिकांच्या निकालात भाजपनं आघाडी घेतलीय. 

सावनेर, खापा, कळमेश्वर आणि रामटेक चार नगरपालिकेत भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. तर पण मोहपामध्ये काँगेसचा नगराध्यक्ष निवडून आलाय. 

काटोल आणि नरखेडमध्ये भाजपला मोठा हादरा बसलाय. भाजप आमदार आशिष देशमुख यांच्या मतदार संघातल्या या दोन्ही नगरपालिकामध्ये भाजपला पराभवाचं तोंड बघावं लागतंय. 

नरखेडमध्ये भाजपचा एकही नगरसेवक निव़डून आलेला नाही. काटोलमध्ये विदर्भ माझा पक्षाच्या वैशाली ठाकुर नगराध्यक्षपदी निवडूण आल्यात. 

Tags: