मुदतपूर्व निवडणुका केव्हाही, 'बाहुबली' खडसेंची भविष्यवाणी

मुदतपूर्व निवडणूक केव्हाही होऊ शकतात असे संकेत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिले आहेत. 

Updated: May 23, 2017, 07:54 PM IST
मुदतपूर्व निवडणुका केव्हाही, 'बाहुबली' खडसेंची भविष्यवाणी title=

धुळे : मुदतपूर्व निवडणूक केव्हाही होऊ शकतात असे संकेत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी देखील बैठकीत मुदतपूर्व निवडणुकांसाठी तयार राहण्याचे संकेत दिल्याची पुष्ठी खडसे यांनी जोडत विधानसभेच्या मुदतपूर्व निवडणुकांच्या चर्चेला तडका दिला आहे. ते धुळ्यात बोलत होते.

विधानसभा निवडणूक मुदतपूर्व होईल, मात्र केव्हा हे सांगता येत नसल्याचे सांगत अप्रत्यक्ष रित्या खडसे यांनी राजकीय वातावरण तापवलं आहे. राज्य आणि केंद्र सरकारने अनेक योजना सुरु केल्या आहेत मात्र यांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहचत नसून विकासाचा वेग मंदावला असल्याची खंत खडसे यांनी व्यक्त केली आहे. 

मंत्रीपदावरून राजीनामा द्यायला लागल्यामुळे एकनाथ खडसे नाराज आहेत. एकनाथ खडसेंच्या याच नाराजीवरून विरोधकांनी फडणवीस सरकारवर निशाणा साधला. कटप्पानं बाहुबलीला का मारलं, असा सवाल आपण खडसेंना केला असल्याचं राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील म्हणाले. जयंत पाटील यांनी विधानसभेत हा प्रश्न विचारल्यावर जोरदार हशा पिकला.