बारामतीत घोड्यांची नृत्य स्पर्धा

बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथील ग्रामस्थांनी हनुमान जयंती उत्सवाचं औचित्य साधत घोड्यांच्या नृत्य स्पर्धा आयोजित केल्या.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 12, 2017, 08:46 AM IST
बारामतीत घोड्यांची नृत्य स्पर्धा title=

बारामती :  बैलगाडा शर्यतीवर बंदी उठवण्यात आली असली तरी बैलगाडा शर्यत आयोजित करण्याच्या फंदात न पडता, बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथील ग्रामस्थांनी हनुमान जयंती उत्सवाचं औचित्य साधत घोड्यांच्या नृत्य स्पर्धा आयोजित केल्या.

या आगळ्यावेगळ्या स्पर्धेत परिसरातील तब्बल २० घोड्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत विश्वजित खोमणे यांच्या ‘माऊली’ या घोड्याने प्रथम क्रमांक मिळवला आहे. ग्रामीण स्तरावर प्रथमच झालेल्या या स्पर्धेसाठी विविध भागातील प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली.

एकीकडे बैलगाडा शर्यतींवरून राजकारण पेटलेलं असताना आणि १२ वर्षांपेक्षा अधिक काळ बैलगाडा शर्यतींमुळे गाजलेल्या झारगडवाडीतील ग्रामस्थांनी घोड्यांच्या नृत्य स्पर्धांचं आयोजन करून एक वेगळा पायंडा पाडलाय..