बाळासाहेब थोरातांवर शाई फेकणाऱ्याकडे गुप्ती

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाई हल्याने आता वेगळे वळण घेतले आहे. थोरातांवर शाई फेकणा-या भाऊसाहेब हासे याच्याकडे गुप्ती हे हत्यार आढळून आले आहे.

Updated: Aug 24, 2014, 11:31 PM IST
बाळासाहेब थोरातांवर शाई फेकणाऱ्याकडे गुप्ती title=

संगमनेर : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाई हल्याने आता वेगळे वळण घेतले आहे. थोरातांवर शाई फेकणा-या भाऊसाहेब हासे याच्याकडे गुप्ती हे हत्यार आढळून आले आहे.

शाही फेकल्या नंतर त्याने गुप्ती काढण्याचा प्रयत्न केला असल्याची फिर्याद थोरात यांचे अंगरक्षक मोरे याने संगमनेर पोलीस स्थानका दाखल केलीये.

हासे याच्या विरुध्द आर्म अँक्ट नुसारही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हासे याचा थोरात यांना इजा पोहचविण्याचा उद्देश होता असं पोलीसांचं म्हणणं आहे.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर संगमनेर शहराजवळील राजापूर येथे शिवसेनेचा युवा सेना तालुका अध्यक्ष भाऊसाहेब हासे याने काळा द्रव फेकला होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.