गोंदिया : गोंदिया जि.प. निकृष्ट कामाकडे लक्ष का देत नाही?, असा प्रश्न देवरी तालुक्यातील लोकांना पडला आहे. या लोकांनी तक्रार करूनही प्रशासन तक्रारीकडे लक्ष देत नसल्याने हा प्रश्न पडला आहे.
लहान लहान गावांतले रस्ते मुख्य रस्त्याला जोडले तर त्या माध्यमातून गावांचा विकास साधला जाईल हे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचं उद्दिष्ट, पण या उद्दिष्टालाच हरताळ फासलं जातंय.
गोंदिया जिल्ह्यातल्या देवरी तालुक्यात असाच प्रकार समोर आला. मात्र ग्रामस्थांच्या तक्रारीनंतरही संबंधित विभागाकडून याची दखल घेतली जात नाहीये. संबंधित जिल्हा परिषदेनं याकडे गांभिर्यानं लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.