औरंगाबाद पालिका निवडणूक : एमआयएमध्ये वाद उफाळला

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एमआयएमध्ये वाद उफाळून आलाय. तिकीटवाटप कमिटीतून औरंगाबाद एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील बाहेर पडलेत.

Updated: Apr 4, 2015, 11:57 PM IST
औरंगाबाद पालिका निवडणूक : एमआयएमध्ये वाद उफाळला title=

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एमआयएमध्ये वाद उफाळून आलाय. तिकीटवाटप कमिटीतून औरंगाबाद एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील बाहेर पडलेत.

अंतर्गत वादामुळे जलील या कमिटीतून बाहेर पडलेत.. जलील यांनी तिकीटवाटप कमिटीचा राजीनामा दिलाय.. दरम्यान वांद्रे पोटनिवडणुकीचं कारण इम्तियाज जलील यांनी दिलंय.

प्रचारात लक्ष घालण्यासाठी राजीनामा दिला असं आमदार साहेब सांगत असले तरी सातत्यानं होणारे आरोपच राजीनाम्याचं मूळ कारण आहे. त्यात तिकीटवाटपासाठी पैसा घेण्यात येतो हा आरोपसुद्धा आता एमआयएमचे कार्यकर्ते करायला लागलेत.

काही तर न्याय मिळण्याच्या नावाखाली उपोषणालाही बसले. मात्र आमदारसाहेब आरोपांत तथ्य नसल्याचं सांगतायत. आपण मुंबईतील प्रचारासाठी राजीनामा दिल्याचे आमदार सांगत आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.