महालक्ष्मी मंदिरात जीवे मारण्याचा प्रयत्न - तृप्ती देसाई

कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी गोंधळ घालणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई हिला मारहाण करण्यात आलीय. 

Updated: Apr 14, 2016, 11:42 AM IST
महालक्ष्मी मंदिरात जीवे मारण्याचा प्रयत्न - तृप्ती देसाई title=

नवी दिल्ली : कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी गोंधळ घालणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई हिला मारहाण करण्यात आलीय. 

न्यूज एजन्सी एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार, मंदिरातच आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप तृप्ती देसाई हिनं केलाय. काही लोकांनी माझे केस खेचले, कपडे फाडले, शिव्या दिल्या गेल्या, असंही तृप्तीनं म्हटलंय. मला वाटता की हल्लेखोरांनी मला ठार मारण्याची योजना बनवली होती, असा आरोप तृप्तीनं केलाय. 

मंदिरातील पूजारी आपल्याला शिव्या देऊन अपशब्द वापरत होते, असं तृप्तीचं म्हणणं आहे. बुधवारी महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तृप्तीवर जमावनं हळद, कुंकू आणि मिरची पावडर फेकली. पोलिसांनी मोठ्या प्रयत्नानंतर तृप्तीला तिथून बाहेर काढलं. त्यानंतर तिला कोल्हापूरच्या एका खाजगी हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आलं.