अश्विनी एकबोटे यांच्यावर रविवारी सकाळी पुण्यात अंत्यसंस्कार

अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचे भरत नाट्य मंदिरात प्रयोग सुरु असताना ह्दयविकाराचा झटका आल्याने निधन झाले. त्यांची अचानक रंगभूमीवरच एक्झिट झाली. त्यांच्यावर उद्या सकाळी 10 वाजता वैकुंड स्मशान भूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Updated: Oct 23, 2016, 12:12 AM IST
अश्विनी एकबोटे यांच्यावर रविवारी सकाळी पुण्यात अंत्यसंस्कार title=

पुणे : अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचे भरत नाट्य मंदिरात प्रयोग सुरु असताना ह्दयविकाराचा झटका आल्याने निधन झाले. त्यांची अचानक रंगभूमीवरच एक्झिट झाली. त्यांच्यावर उद्या सकाळी 10 वाजता वैकुंड स्मशान भूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

रविवारी सकाळी 8.30 वाजता अश्विनी एकबोटे यांचा पार्थिव अंतिम दर्शनासाठी टिळक स्मारक येथे ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या जाण्याने अनेक मान्यवर कलाकारांनी, अभिनेत्री आणि अभिनेत्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहली.

पुण्यातील भरत नाट्य मंदिरात नाट्य त्रिविधा हा कार्यक्रम सुरु होता. त्यावेळी अश्विनी एकबोटे कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. त्यांनी रंगमंचावर आपले नृत्य सादर करण्यासाठी गिरकी घेतली. त्याचवेळी त्या कोसळल्या. यावेळी त्यांना हृद्यविकाराचा झटका आहे. अश्विनी एकबोटे या नाट्य- सिने आणि नृत्यांगना म्हणून प्रसिद्ध होत्या. त्या गुणी कलाकार म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या पश्चात पती प्रमोद आणि मुलगा शुभंकर आहे.

त्यांनी दूर्वा, राधा ही बावरी, असंभव, कशाला उद्याची बात यासारख्या मालिकांमधून अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली. त्या घराघरात पोहोचल्या होत्या. साधा ही बावरीमध्ये त्यांनी चांगला अभिनय केला होता. सध्या अश्विनी एकबोटे या कलर्स वाहिनीवर सुरु असलेल्या ‘गणपती बाप्पा मोरया’ या मालिकेत रावणाच्या आईची भूमिका साकारत होत्या.

अश्विनी यांनी अनेक मराठी चित्रपटांतही महत्त्वाची भूमिका साकारल्या आहेत. महागुरु, बावरे प्रेम हे, तप्तपदी, आरंभ, क्षण हा मोहाचा, हायकमांड या मराठी सिनेमात त्यांची भूमिका होती.