गडचिरोलीमध्ये सर्वच पक्षांमध्ये चुरस

जिल्ह्यातल्या देसाईगंज आणि गडचिरोली या दोन नगरपरिषदांसाठी आज मतदान पार पडलं. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत गडचिरोलीत 55.58 टक्के तर देसाईगंज इथं 53.23 टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली.

Updated: Dec 18, 2016, 07:01 PM IST
गडचिरोलीमध्ये सर्वच पक्षांमध्ये चुरस title=

गडचिरोली : जिल्ह्यातल्या देसाईगंज आणि गडचिरोली या दोन नगरपरिषदांसाठी आज मतदान पार पडलं. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत गडचिरोलीत 55.58 टक्के तर देसाईगंज इथं 53.23 टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली.

गेल्यावेळी देसाईगंजमध्ये भाजपनं एकहाती सत्ता घेतली होती. सर्वच पक्षांनी इथे स्वतंत्र निवडणूक लढवली. तर गडचिरोलीमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना मैदानात उतरले. विशेष म्हणजे काँग्रेसच्या कुठल्या बड्या नेत्यानं या भागात प्रचारासाठी रस दाखवला नव्हता. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांशिवाय इतर कुणीही इथे प्रचाराला आलं नव्हतं. आता मतदाराचा कौल कुणाला मिळणार हे सोमवारी स्पष्ट होणार आहे.