अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवलीत?

90 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवलीत होणार यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. आगामी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यासाठी डोंबिवलीसह, कल्याण आणि बेळगावचे आयोजक उत्सुक आहेत. मात्र आता यंदाचं साहित्य संमेलन डोंबिवलीत होणार असल्याचं समजतंय.  

Updated: Sep 18, 2016, 09:03 PM IST
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवलीत? title=

मुंबई : 90 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवलीत होणार यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. आगामी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यासाठी डोंबिवलीसह, कल्याण आणि बेळगावचे आयोजक उत्सुक आहेत. मात्र आता यंदाचं साहित्य संमेलन डोंबिवलीत होणार असल्याचं समजतंय.  

साहित्य संमेलनाचं यजमानपद मिळावं यासाठी कल्याण आणि डोंबिवली या दोन्ही शहरांनी कंबर कसलीय. यजमानपदासाठी दोन्ही शहरांनी दावा केलाय. कल्याणमध्ये सार्वजनिक वाचनालयातर्फे तर डोंबिवलीत आगरी युथ फोरमतर्फे यजमानपदासाठी अर्ज करण्यात आलाय. 

मराठी साहित्य परिषदेतर्फे नुकताच दोन्ही शहरांचा पाहणी दौरा करण्यात आला होता. या दोन्ही शहरांसोबतच बेळगावही स्पर्धेत आहे. 

डोंबिवलीत साहित्यिकांचा मेळावा भरावा म्हणून आयोजनासाठी डोंबिवलीकर प्रचंड उत्सुक आहेत. मात्र त्याचबरोबर कल्याण आणि बेळगावमध्ये यंदाचं साहित्य संमेलन व्हावं यासाठीही काही मंडळी आग्रही आहेत. मात्र अखेर डोंबिवलीत हे साहित्य संमेलन आयोजित करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं समजतंय.  याची अधिकृत घोषणा 20 सप्टेंबरला परिषदेच्या बैठकीत नागपुरला होण्याची शक्यता आहे.