अभिनेत्री पल्लवी जोशीचाही 'एफटीआयआय'ला 'रामराम'

अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी एफटीआयआय सोसायटी सदस्यपदाचा राजीनामा, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवांकडे पाठवून दिला आहे.

Updated: Jul 6, 2015, 01:38 PM IST
अभिनेत्री पल्लवी जोशीचाही 'एफटीआयआय'ला 'रामराम' title=

पुणे : अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी एफटीआयआय सोसायटी सदस्यपदाचा राजीनामा, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवांकडे पाठवून दिला आहे.

एफटीआयआय संस्थेच्या प्रमुखपदी गजेंद्र चौहान यांची नियुक्ती केल्याने हा वाद सुरू आहे. 

या सर्व गोंधळाचा भाग होऊ इच्छीत नाही, तसेच मागील तीन आठवड्यापासून मी हे पाहत आहे, हे मला खूपच त्रासदायक आहे, जेथे विद्यार्थी खुश नाहीत, तेथे मी माझे काही अनुभव शेअर करणार, मी विद्यार्थ्यांसोबत आहे, प्रत्यक्षात विद्यार्थ्यांसोबत आंदोलनात सामील व्हायचं किंवा नाही ते अजून ठरवलं नसल्याचं, अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी म्हटलं आहे.

पुरस्कारप्राप्त चित्रपटनिर्माते जाहनू बरुआ यांनी ‘एफटीआयआय‘ सोसायटीचे सदस्य न राहण्याची इच्छा यापूर्वीच दर्शविली होती. 

आता अभिनेत्री पल्लवीनेही माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला याबाबत लेखी कळविले आहे. या सोसायटीचा आणि प्रशासकीय मंडळाचा घटक म्हणून मला यापुढे विचारात घेऊ नये, असे तिने मंत्रालयाला सांगितले आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.