पानसरे हत्या प्रकरण : आरोपी गायकवाड 'सनातन'चा पूर्णवेळ कार्यकर्ता

गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोप समीर गायकवाड हा वादग्रस्त सनातन संस्थेचा पूर्णवेळ कार्यकर्ता असल्याची धक्कादायक माहिती एसआयटी प्रमुख - पोलीस महानिरीक्षक संजीव कुमार यांनी दिलीय. 

Updated: Sep 16, 2015, 02:49 PM IST
पानसरे हत्या प्रकरण : आरोपी गायकवाड 'सनातन'चा पूर्णवेळ कार्यकर्ता title=

कोल्हापूर : गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोप समीर गायकवाड हा वादग्रस्त सनातन संस्थेचा पूर्णवेळ कार्यकर्ता असल्याची धक्कादायक माहिती एसआयटी प्रमुख - पोलीस महानिरीक्षक संजीव कुमार यांनी दिलीय. 

अधिक वाचा - गोविंद पानसरे हत्या प्रकरणात पहिली अटक; पोलिसांचा सांगलीत छापा

३२ वर्षांचा समीर विष्णू गायकवाड याला मंगळवारी रात्री ८.०० वाजता पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. चौकशी केल्यानंतर सकाळी ४.३० वाजता अटक केली, अशी माहिती एसआयटी प्रमुखांनी प्रसार माध्यमांना दिलीय. 

पण, या अटकेमुळे हत्येचं गूढ सुटलंय असं म्हणता येणार नाही... संशयाच्या बळावर आणि काही फोन कॉलच्या माहितीच्या आधारे गायकवाडला अटक करण्यात आलीय असं संजीव कुमार यांनी म्हटलंय. 


सौ. सनातन संस्था

कोण आहे हा समीर गायकवाड
३२ वर्षांचा समीर विष्णू गायकवाड हा सांगलीच्या शंभर फुटी रोडवरील मोती चौक परिसरात राहत होता. गायकवाड १९९८ पासून सनातन संस्थेत पूर्णवेळ काम करतो. मोबाईल रिपेअरिंगचं काम करणारा समीर गायकवाड हा मुंबईत सनातन संस्थेचा 'धर्मरथ' चालवायचं काम करत होता.  

इतकंच नाही तर त्याचं संपूर्ण कुटुंब सनातन संस्थेशी संबंधित आहे. त्याची पत्नी सध्या गोव्यातल्या आश्रमात राहतेय. कॉम्रेड गोविद पानसरेंच्या हत्या प्रकरणात संशयित म्हणून गायकवाडला अटक करण्यात आल्यानंतर त्याच्या सांगलीच्या घरी पोलिसांनी छापा मारलाय. पानसरे यांच्या हत्येत त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष गायकवाडचा संबंध असू शकतो, असा पोलिसांना संशय आहे. या अटकेमुळे या हत्या प्रकरणात महत्त्वाचे धागे दोरे हाती लागलेत असा विश्वास पोलिसांना आहे.

गायवाडची झाडाझडती सुरू असून यासंबंधी सांगली, मुंबई, नवी मुंबईत तपास करणार असल्याचं पोलिसांनी म्हटलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.