काकूनंच केला ५ वर्षांच्या पुतण्याचा खून, पुण्यातला धक्कादायक प्रकार

मुलगी नसल्याने सतत टोमणे ऐकावे लागायचे याचाच राग येऊन महिलेनं शेजारीच राहणा-या आपल्या पुतण्याचा खून केला आहे.

Updated: Mar 24, 2017, 09:45 AM IST
काकूनंच केला ५ वर्षांच्या पुतण्याचा खून, पुण्यातला धक्कादायक प्रकार  title=

पुणे : मुलगी नसल्याने सतत टोमणे ऐकावे लागायचे याचाच राग येऊन महिलेनं शेजारीच राहणा-या आपल्या पुतण्याचा खून केला आहे. पुण्यातल्या हडपसरमध्ये ही घटना घडलीय. माऊली विनोद खांडेकर असं या चिमुरड्याचं नाव आहे. अनिता खाम खांडेकर असं आरोपी महिलेचं नावं आहे. तिला पोलिसांनी अटक केली आहे.

हडपसर येथील काळेपडळ ससाणेनगर परिसरातून काल सकाळी माऊली विनोद खांडेकर हा ५ वर्षाचा मुलगा बेपत्ता झाला होता कुटुंबीयांनी व नातेवाईकांनी बराच वेळ शोध घेतला मात्र तो न सापडल्यानं हडपसर पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखर केली होती.

पोलीस तपासात मुलाचा त्याच्या सख्या काकूनेच गळा आवळून खून करून काही काळ घरामध्ये खाटेखाली मृतदेह लपवून ठेवला नंतर घरातील मंडळी व पोलीस मुलाच्या शोधात घराबाहेर पडल्यानंतर घरामागील बाजूस असणाऱ्या पाण्याचा ड्रम मध्ये टाकला.