पुणे शहराला लागून ३४ गावांचा पालिकेत समावेश होण्याची शक्यता

शहराला लागून असलेल्या ३४ गावांचा पालिकेत समावेश होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत.

Updated: May 4, 2017, 12:56 PM IST
पुणे शहराला लागून ३४ गावांचा पालिकेत समावेश होण्याची शक्यता title=

पुणे : शहराला लागून असलेल्या ३४ गावांचा पालिकेत समावेश होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत.

गावांच्या समावेशाबाबतची राज्य सरकारची अंतिम भूमिका मुंबई उच्च न्यायालयात स्पष्ट केली जाणार आहे. शहर आणि शहरालगतची गावं यांच्यातील सीमा आता नष्ट झाल्या आहेत. ही गावं शहराचाच भाग बनली आहेत. तरीदेखील ती अजूनही महापालिका क्षेत्राच्या बाहेरच आहेत. त्यामुळे धड गाव ना शहर अशी अवस्था निर्माण झाल्यानं तिथं विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे शहराला लागून असलेली ही गावं महापालिकेत सामावून घेण्याची सर्वपक्षीय कृती समितीची मागणी आहे.

महापालिका तसेच जिल्हा परिषदेनं अनुकूलता दर्शवल्यानंतर राज्य सरकारनं त्याबाबतची अधिसूचना २०१४ मधेच जारी केली होती. असं असताना ही गावं समाविष्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आहे. त्यामुळे कृती समितीतर्फे उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मागील सुनावणीच्या वेळी उच्च न्यायालयानं राज्य सरकारला याबाबत चांगलच फटकारलं होतं. यांदर्भात सरकारची भूमिका स्पष्ट करण्यास न्यायालयाने सांगितले आहे. त्यामुळं आता उच्च न्यायालयात सरकार काय भूमिका मांडणार याकडं नजरा लागल्या आहेत.