दिग्रसमध्ये 31 लाख 68 हजारांची रोकड जप्त

वाहन तपासणीदरम्यान 31 लाख 68 हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे. यवतमाळच्या दिग्रसमध्ये ही रोकड जप्त करण्यात आली.

Updated: Nov 12, 2016, 05:47 PM IST
दिग्रसमध्ये 31 लाख 68 हजारांची रोकड जप्त  title=

यवतमाळ : वाहन तपासणीदरम्यान 31 लाख 68 हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे. यवतमाळच्या दिग्रसमध्ये ही रोकड जप्त करण्यात आली.

नगरपरिषद आणि विधान परिषद निवडणुकीमुळे वाहनांची मोठ्याप्रमाणात तपासणी सुरू आहे. ही मोठी रोकड सापडल्याने खळबळ उडाली आहे. दिग्रस नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने शहर आणि शहराबाहेरच्या हद्दीत ही वाहन तापसणी सुरू आहे.

वाहन तापसणी सुरू असताना एका वाहनात 24 लाखांची रोकड सापडली. निवडणूक अधिकारी संदीपकुमार अपार आणि तहसीलदार बागडे आणि मुख्याधिकारी टाले यांनी संयुक्तपणे जप्तीची कारवाई केली.