मैत्रिणीशी झालेल्या वादानंतर तरुणाची आत्महत्या

लहानसहान कारणांवरुन आत्महत्या करणाऱ्या तरुणांची संख्या सातत्याने वाढतेय. मैत्रिणीशी वाद झाल्याच्या कारणावरुन नवी मुंबईत एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये.

Updated: Nov 19, 2016, 08:30 AM IST
मैत्रिणीशी झालेल्या वादानंतर तरुणाची आत्महत्या title=

नवी मुंबई : लहानसहान कारणांवरुन आत्महत्या करणाऱ्या तरुणांची संख्या सातत्याने वाढतेय. मैत्रिणीशी वाद झाल्याच्या कारणावरुन नवी मुंबईत एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये.

अक्षय कारखेले असे 22 वर्षीय तरुणाचे नाव आहे. मुंबईतल्या कॉटन ग्रीन भागात तो राहत होता. तो आपल्या मैत्रिणीसोबत साईछत्र लॉजमध्ये असताना त्याच्या तिच्याशी वाद झाला. 

यादरम्यान त्याची मैत्रिणी बाथरुममध्ये गेली असता अक्षयने तिच्या ओढणीचा वापर करत गळफास लावून आत्महत्या केली. वाद कशामुळे झाला, त्याने इतके टोकाचे पाऊल का उचलले याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.