ऑडिट - परभणी (लोकसभा मतदारसंघाचं)

संत जनाबाई यांची जन्मभुमीनं पावन झालेला परभणी जिल्हा..मराठवा़ड्यातील परभणी जिल्हा हा पूर्वी निजामाच्या अधिपत्याखाली होता. परभणीला अगोदर प्रभावतीनगर असे म्हणत. याच परभणीपासून अलग होत 1 मे 1999 ला विलग होत हिंगोली जिल्ह्याची स्थापना झाली. संत नामदेवांच्या नरसी क्षेत्रामुळे हिंगोलीची विशेष ओळख बनलीय.

Updated: Oct 7, 2014, 09:33 PM IST
 title=

परभणी : संत जनाबाई यांची जन्मभुमीनं पावन झालेला परभणी जिल्हा..मराठवा़ड्यातील परभणी जिल्हा हा पूर्वी निजामाच्या अधिपत्याखाली होता. परभणीला अगोदर प्रभावतीनगर असे म्हणत. याच परभणीपासून अलग होत 1 मे 1999 ला विलग होत हिंगोली जिल्ह्याची स्थापना झाली. संत नामदेवांच्या नरसी क्षेत्रामुळे हिंगोलीची विशेष ओळख बनलीय.

परभणीत सेलू, जिंतूर, गंगाखेड, पाथरी, पालम, पूर्णा, मानवत, सोनपेठ आणि परभणी हे तालुके येतात. 

परभणी मतदारसंघाचा विचार करता जिंतूर, परभणी, गंगाखेड आणि पाथरी असे चार विधानसभा मतदारसंघ येतात.

राजकीय बलाबलाचा विचार करता शिवसेनेच्या वाट्याला दोन मतदारसंघ, काँग्रेसकडे एक, आणि एक मतदारसंघ अपक्षाकडे आहे.

2009 च्या निव़डणुकीचा विचार करता

परभणीमध्ये शिवसेनेचे संजय जाधव यांना 20 हजार 523 मताधिक्य मिळाले होते.

पाथरीमध्ये शिवसेनेच्याच मिराकल्याण रेंगे यांना  18 हजार 880 मताधिक्य मिळाले होते.

जिंतूरमध्ये कॉंग्रेसच्या रामप्रसाद बोर्डीकर यांना 1 हजार 225  मताधिक्य मिळाले होते.

गंगाखेडमध्ये अपक्ष आमदार सीताराम घनदाट यांना 18880 एवढे मताधिक्य मिळाले होते.

परभणीचा विचार करता इथली संपुर्ण अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. रस्ते, पाणी वीज या मुलभुत समस्या इथही भेडसावत आहे.

तर हिंगोलीचा विचार करता हिंगोली जिल्ह्यात औढा नागनाथ, सेनगाव, कळमनुरी, वसमत, आणि हिंगोली अशा पाच तालुक्यांचा समावेश आहे. 

तर विधानसभेसाठी वसमत, कळमनुरी आणि हिंगोली अशा तीन मतदारसंघाची पुनर्रचनेनंतर निर्मीती झालीय.

हिंगोलीचे राजकिय चित्र पाहता तीन पैकी दोन मतदारसंघ कॉंग्रेसकडे तर एक मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे.

वसमतमध्ये राष्ट्रवादीचे जयप्रकाश दांडेगावकर यांना 2 हजार 844 मताधिक्य मिळाले होते

कळमनुरीमध्ये काँग्रेसच्या राजीव सातव यांना 8 हजार 227 मताधिक्य मिळाले होते

हिंगोलीमध्ये काँग्रेसच्या भाऊराव पाटील  यांना  3 हजार 945 मताधिक्य मिळाले होते.

लोकसभा निवडणुकीमुळे हिंगोली आणि परभणीच्या राजकारणातील लढतीला आता अटीतटीचे रुप मिळालंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.