ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - राजापूर

राजापूर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र 2005 मध्ये नारायण राणेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसचा हात धरला आणि हा मतदारसंघ काँग्रेसकडे गेला. मात्र पुढे राजन साळवींनी 2009 मध्ये पुन्हा इथं सेनेचा भगवा फडकवला.

Updated: Oct 8, 2014, 05:28 PM IST
 title=

रत्नागिरी : राजापूर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र 2005 मध्ये नारायण राणेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसचा हात धरला आणि हा मतदारसंघ काँग्रेसकडे गेला. मात्र पुढे राजन साळवींनी 2009 मध्ये पुन्हा इथं सेनेचा भगवा फडकवला.
 
विधानसभा निवडणूक 2014 चे उमेदवार - 
शिवसेना - राजन साळवी
भाजप - संजय यादवराव
काँग्रेस - राजेंद्र देसाई
राष्ट्रवादी - अजित यशवंतराव

राजापूर विधानसभा मतदारसंघ चर्चेत राहीला तो इथल्या जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पामुळे. जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेने विरोध दर्शविला आणि जनमाणसावर शिवसेनेची पकड अधिक घट्ट झाली. 

जैतापूर प्रकल्पाला विरोध करणारे राजन साळवी 2009 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आले.

राणे समर्थक गणपत कदम यांना पराभूत व्हावं लागलं. आगामी निवडणुकीत आपणच पुन्हा एकदा विजयी पताका फडकवणार असा विश्वास राजन साळवींना वाटतोय. 

मतदारसंघातील कामं... 
- पाणीपुरवठा 
- रस्ता, पाखाडी 
- संरक्षक भिंती 
- शासकीय कार्यालयांना संगणक

अशी अनेक कोट्यवधींची विकास कामे केल्याचा दावा ते करताहेत. असले तरी इथे अनेक समस्या आहे तशाच आहेत

- रस्ते डांबरीकरण मात्र दूरवस्था कायम
- आरोग्य केंद्राची गरज
- राजापूरमधील धरण प्रकल्प कधी कार्यान्वित होणार? 
- पर्यटनस्थळांकडे दुर्लक्ष
- रोजगाराच्या संधी नाहीत

काँग्रेससाठीही हा मतदारसंघ म्हणावा तितका सोपा राहिलेला नाही.. अनेक राणे समर्थक नाराज असून ते सेनेच्या वाटेवर असल्यानं राणेंसाठी आणि काँग्रेससाठी ती डोकेदुखी ठरु शकते. 

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांनी संघटना बांधणीवर भर दिला आहे...आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रमेश कीर इच्छुक असून त्यांनी गावोगावी बैठका घेण्यास सुरूवात केलीय.

शिवसेनेचा जैतापूर प्रकल्पाला विरोध असून याच मुद्यावरुन सेना-भाजपात कलगीतुरा रंगला होता..आणि त्याचाच फटका आता सेनेला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. हाच मुद्दा आगामी निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरू शकतो.

राजापूर विधानसभा मतदारसंघातील लढत ही चुरशीची होणार हे उघड आहे. त्यातच जैतापूरच्या प्रकल्पाचं भांडवल दोन्ही राजकीय पक्ष करणार मात्र याचा फायदा नेमका कोणाला होतोय हेही पाहणं औत्सक्याचं ठरणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.