ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - पलूस-कडेगाव

धक्कादायक निकाल देणारा मतदारसंघ म्हणून सांगली जिल्ह्यातल्या पलूस-कडेगाव मतदारसंघाची ओळख. स्वतः वनमंत्री पतंगराव कदम हे या मतदारसंघातून पाच वेळा विजयी झाले असले, तरी त्यांनाही तीन वेळा पराभूत व्हावं लागंलय. त्यांचे परंपरागत प्रतिस्पर्धी पृथ्वीराज देशमुख यांनी यावेळी त्यांना कडवं आव्हान देण्याचं मनावर घेतल्याने लढत रंगतदार आहे हे निश्चित.

Updated: Oct 8, 2014, 05:13 PM IST
 title=

सांगली : धक्कादायक निकाल देणारा मतदारसंघ म्हणून सांगली जिल्ह्यातल्या पलूस-कडेगाव मतदारसंघाची ओळख. स्वतः वनमंत्री पतंगराव कदम हे या मतदारसंघातून पाच वेळा विजयी झाले असले, तरी त्यांनाही तीन वेळा पराभूत व्हावं लागंलय. त्यांचे परंपरागत प्रतिस्पर्धी पृथ्वीराज देशमुख यांनी यावेळी त्यांना कडवं आव्हान देण्याचं मनावर घेतल्याने लढत रंगतदार आहे हे निश्चित.

विधानसभा निवडणूक 2014 चे उमेदवार - 

शिवसेना - लालासाहेब गोंदिल
भाजप - पृथ्वीराज देशमुख
काँग्रेस - पतंगराव कदम    
राष्ट्रवादी - सुरेखा लाड 

सांगली जिल्ह्यातील 'पलूस कडेगाव' मतदारसंघ म्हणजेच पूर्वीचा वांगी - भिलवडी मतदारसंघ. या मतदार संघाची निर्मिती १९७८ साली झाली. 

भिन्न आर्थिक आणि भौगोलिक परिस्थिती असलेला हा मतदारसंघ असून, घाटावरील कडेगाव दुष्काळी तर घाटाखालील पलूस हा सधन तालुका म्हणून ओळखला जातो. काँग्रेसचे संपतराव चव्हाण हे १९७८ ते १९८५ पर्यंत इथे आमदार होते. संपतराव चव्हाण यांच्या विरोधात १९८० च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून उभे असलेले पतंगराव कदम हे केवळ ८६ मतांनी पराभूत झाले होते. 

मात्र, १९८६ च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून पतंगराव कदम यांनी पहिल्यांदा विजयी बाजी मारली. १९९६ च्या पोट निवडणुकीत स्वर्गीय संपतराव देशमुख यांचे पुतणे पृथ्वीराज देशमुख यांनी पतंगराव कदम यांचा पराभव केला. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा पतंगरावांनी १९९९ मध्ये आमदारकी मिळवली. 

पतंगराव कदम यांनी भारती विद्यापीठ, सोनहिरा सहकारी साखर कारखाना, सूतगिरणी, बँक, बझार या सारख्या संस्थांची उभारणी करून रोजगाराची मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. 

- दुष्काळी कडेगाव तालुका सिंचनाखाली
- टेंभू ,ताकारी योजनांना गती 
- वनअधिका-यांसाठी प्रशिक्षण संस्था 
- कडेगाव तालुक्यासाठी ११० कोटी
- पलूससाठी १२५ कोटींचा निधी
- पर्यटन वाढीसाठी प्रयत्न 
अशी अनेक विकासकामे केल्याचा दावा पतंगराव कदम यांनी केला आहे.

पतंगराव विकासकामांची यादी देत असले तरी परिसरात अनेक समस्या वर्षानुवर्षे तशाच असल्याची टीका होते आहे
- टेंभू ,ताकारी योजना पंधरा वर्षांपासून रखडलेली पिकांना पाणी नाही, वाढती वीजचोरी
- नवीन वीज कनेक्शनसाठी अडचणी
- तरुणांमध्ये वाढती बेरोजगारी
- रस्त्यांची दूरवस्था 
- देवराष्ट्रमध्येही निकृष्ट दर्जाची कामे
- ऊस दराचा मोठा प्रश्न अजूनही तसाच आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार पृथ्वीराज देशमुख पुन्हा एकदा बंडखोरी करून भाजपच्या गोटात शिरले आहेत. हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने कदाचित ते धनुष्यबाण हाती घेण्याच्याही तयारीत आहेत.

मंत्रीमंडळात अनेक मोठी खाती सांभाळणा-या पतंगरावांना एका पदाने मात्र कायमच हुलकावणी दिली आहे. मुख्यमंत्री बनण्याचं त्यांचं स्वप्न यंदा तरी पूर्ण होणार का याकडेही आता सगळ्यांचं लक्ष आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.