कट्टर शिवसैनिकाला ८०० चप्पल जोड भेट

बाळासाहेबांचा शिवसैनिक किती कट्टर असतो, किती मनापासून काम करतो याचं उदाहरण आहेत अरविंद भोसले. शिवसेना नेते अरविंद भोसले यांनी तब्बल नऊ वर्षानंतर पायात चप्पल घातलीय, नारायण राणे हे शिवसेनासोडून काँग्रेसमध्ये गेले होते, आता नारायण राणे यांचा शिवसेनेकडून पराभव झाल्यानंतर अरविंद भोसले यांनी चप्पल घातलीय.

Updated: Oct 28, 2014, 08:34 PM IST
कट्टर शिवसैनिकाला ८०० चप्पल जोड भेट title=

मुंबई : बाळासाहेबांचा शिवसैनिक किती कट्टर असतो, किती मनापासून काम करतो याचं उदाहरण आहेत अरविंद भोसले. शिवसेना नेते अरविंद भोसले यांनी तब्बल नऊ वर्षानंतर पायात चप्पल घातलीय, नारायण राणे हे शिवसेनासोडून काँग्रेसमध्ये गेले होते, आता नारायण राणे यांचा शिवसेनेकडून पराभव झाल्यानंतर अरविंद भोसले यांनी चप्पल घातलीय.

अरविंद भोसले यांनी नऊ वर्षानंतर चप्पल घातल्यानंतर मित्रांकडून त्यांना चपला भेट म्हणून दिल्या जात आहेत. भोसले हे वरळीत राहतात, त्यांच्या घरी आतापर्यंत ८०० चप्पलचे जोड भेट म्हणून आले आहेत.
 
अरविंद भोसलेंनी का घेतली होती शपथ?
 नारायण राणे यांनी शिवसेना सोडली ही बाळासाहेबांशी आणि शिवसेनेशी केलेली गद्दारी आहे, असा दावा अरविंद भोसले यांचा होता, नारायण राणे २००५ मध्ये शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये दाखल झाले. यावर त्यांनी कोकणात जोपर्यंत भगवा फडकत नाही, तोपर्यंत चप्पल घालणार नाही, अशी शपथ घेतली होती.

विधानसभेच्या निवडणुकीत वैभव नाईक यांनी नारायण राणे यांचा १० हजार मतांनी पराभव केल्यानंतर, कोकणात भगवा फडकला आणि नऊ वर्षांच्या तपस्येनंतर अरविंद भोसले यांनी पायात चप्पल घातली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.