सकाळच्या सर्वेत कोणालाही नाही स्पष्ट बहुमत

 ‘सकाळ’च्या राज्यव्यापी सर्वेमध्ये त्रिशंकू स्थिती असल्याचे दिसते आहे. कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाणार नसल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ही भाजप हा प्रथम क्रमांकाचा पक्ष दाखविला असून शिवसेना दुसऱ्या, राष्ट्रवादी तिसऱ्या, काँग्रेस चौथ्या आणि मनसे-अन्य पाचव्या क्रमांकावर असणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Updated: Oct 11, 2014, 01:49 PM IST
सकाळच्या सर्वेत कोणालाही नाही स्पष्ट बहुमत title=

मुंबई : ‘सकाळ’च्या राज्यव्यापी सर्वेमध्ये त्रिशंकू स्थिती असल्याचे दिसते आहे. कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाणार नसल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ही भाजप हा प्रथम क्रमांकाचा पक्ष दाखविला असून शिवसेना दुसऱ्या, राष्ट्रवादी तिसऱ्या, काँग्रेस चौथ्या आणि मनसे-अन्य पाचव्या क्रमांकावर असणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

भाजप क्रमांक एकचा पक्ष 
या सर्वेत भाजपच्या वाटेला ९० जागा देण्यात आल्या आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपला ४६ जागा मिळाल्या होत्या. या जागांमध्ये तब्बल ५० जागांची वाढ दाखविण्यात आली आहे. त्यामुळे युती तुटल्याचा आणि काँग्रेस राष्ट्रवादीविरोधी लाटेचा फायदा भाजपला झाल्याचे दाखविण्यात आले आहे. मोदी फॅक्टर अजूनही कायम असल्याचे या सर्वेत दाखविण्यात आले आहे.

शिवसेनेला जरासाच फायदा
शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनेल, त्यांना ६१ जागा देण्यात आल्या आहेत. गेल्या निवडणुकीत शिवसेनेला ४४ जागा मिळाल्या होत्या. या जागांमध्ये तब्बल १७ जागांची वाढ दाखविण्यात आली आहे. त्यामुळे युती तुटल्याचा फायदा तसेच सरकार विरोधी लाटेचा फायदा शिवसेनेला झाला नसल्याचे  दाखविण्यात आले आहे. 

राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमांकावर 
राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष असणार असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यांना ५९ जागा देण्यात आल्या आहेत. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला ६२ जागा मिळाल्या होत्या. या जागांमध्ये केवळ ३  जागांचे नुकसान दाखविण्यात आले आहे.  

काँग्रेसला दणका 
काँग्रेस चौथ्या क्रमांकाचा पक्ष ठरणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यांना ५१ जागा देण्यात आल्या आहेत. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला ८२ जागा मिळाल्या होत्या. या जागांमध्ये तब्बल ४१ जागांचे नुकसान दाखविण्यात आले आहे.  सरकार विरोधी लाटेचा फटका सर्वाधिक काँग्रेसला बसल्याचे दिसते आहे.

राज ठाकरे आणि अपक्षांचा करिष्मा नाही

मनसे आणि अपक्षांचा करिष्मा चालणार नाही असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यांना २३ जागा देण्यात आल्या आहेत. गेल्या निवडणुकीत मनसेला १३ आणि इतरांना ४१ जागा मिळाल्या होत्या.

 

पक्ष 

 जागा

भाजप                    

९४

शिवसेना                 

६१

राष्ट्रवादी                 

५९

काँग्रेस                    

५१

मनसे - अपक्ष-इतर                     

२३

एकूण         

२८८