नवनिर्वाचीत भाजपा आमदाराचं निधन

मुखेडचे भाजपचे नवनिर्वाचीत आमदार गोविंद राठोड यांचं निधन झालंय. देवगिरी एक्स्प्रेसने नांदेडहून मुंबईला येतांना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. गोविंद राठोड यांना उपचारासाठी जालन्यातील रूग्णालयात दाखल केलं पण अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

Updated: Oct 27, 2014, 03:53 PM IST
नवनिर्वाचीत भाजपा आमदाराचं निधन title=

नांदेड : मुखेडचे भाजपचे नवनिर्वाचीत आमदार गोविंद राठोड यांचं निधन झालंय. देवगिरी एक्स्प्रेसने नांदेडहून मुंबईला येतांना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. गोविंद राठोड यांना उपचारासाठी जालन्यातील रूग्णालयात दाखल केलं पण अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

गोविंद राठोड हे यापूर्वी अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते, यावेळी त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती. भाजपच्या आमदारांची मुंबईत बैठक होतेय. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी गोविंद राठोड मुंबईत येणार होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.