लिटिल लता मंगेशकर, लता मंगेशकर यांची वारस!

सोशल मीडियावर एक व्हिडिओ फिरत होता. या व्हिडिओला मिळणारी पसंती पाहता, याचा शोध घेण्याचा प्रयत्न झी मीडियाने केला. ती कुठे राहते, ती काय करते, ती कोण आहे? याची कोणाला माहिती नाही. लिटल लता मंगेशकर, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. लता मंगेशकर यांची वारस सापडल्याचे बोलले जात आहे.

Updated: Nov 25, 2014, 01:48 PM IST
लिटिल लता मंगेशकर, लता मंगेशकर यांची वारस! title=

मुंबई : सोशल मीडियावर एक व्हिडिओ फिरत होता. या व्हिडिओला मिळणारी पसंती पाहता, याचा शोध घेण्याचा प्रयत्न झी मीडियाने केला. ती कुठे राहते, ती काय करते, ती कोण आहे? याची कोणाला माहिती नाही. लिटल लता मंगेशकर, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. लता मंगेशकर यांची वारस सापडल्याचे बोलले जात आहे.

या लहान मुलीचा आवाज हुबेहुब स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याप्रमाणे आहे. युट्युबवर हा व्हिडिओला चांगली पसंती मिळाली आहे. अनेकांनी टि्टवर आपल्या प्रतिक्रिया दिल्यात.

कोणी म्हटलेय, ही लिटिल लता मंगेशकर आहे. ही तर दैवी शक्ती आहे. लता मंगेशकर यांनी गायलेले गाणे तिने सहज गायलं आहे. याच गाण्याचा व्हिडिओ व्हिट्सअॅपवर फिरत आहे.

झी मीडियाने या लिटिल लता मंगेशकर हिला 'सरस्वती' असे नाव दिले आहे. स्वर सरस्वती हिच्या गाण्याने अनेकांना मोहीनी घातली आहे. लहान वयात सरस्वतीच्या कंठात स्वर देवाने दिले आहे. त्याच आधारे ती गाणे गात आहे. तिला ही दैवी शक्ती मिळाली आहे, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.