Year Ender 2015 : उल्लेखनीय मराठी सिनेमे

२०१५ हे वर्ष मराठी सिनेमांसाठी अत्यंत सुखद अनुभव घेऊन आलं. या वर्षात मराठी सिनेमांनी अनेक पुरस्कार पटकावून मराठी सिनेसृष्टीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं... शिवाय, बॉक्स ऑफिसवरही 'हिट'ची पाटी झळकावत गल्लाही गोळा केला... पाहुयात, यंदाच्या उल्लेखनीय सिनेमांबद्दल थोडक्यात.... 

Updated: Dec 18, 2015, 01:56 PM IST
Year Ender  2015 : उल्लेखनीय मराठी सिनेमे title=

मुंबई : २०१५ हे वर्ष मराठी सिनेमांसाठी अत्यंत सुखद अनुभव घेऊन आलं. या वर्षात मराठी सिनेमांनी अनेक पुरस्कार पटकावून मराठी सिनेसृष्टीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं... शिवाय, बॉक्स ऑफिसवरही 'हिट'ची पाटी झळकावत गल्लाही गोळा केला... पाहुयात, यंदाच्या उल्लेखनीय सिनेमांबद्दल थोडक्यात.... 

कट्यार काळजात घुसली
२०१५ सालातला सगळ्यात सुपरहीट ठरलेला हा सिनेमा... सुबोध भावे दिग्दर्शित ह्या चित्रपटाद्वारे मराठी रंगभूमीवरील अत्यंत लोकप्रिय कट्यार काळजात घुसली ह्या नाटकाचे मोठ्या पडद्यावर रूपांतर करण्यात आलं. 'कट्यार काळजात घुसली' हा चित्रपट १३ नोव्हेंबर २०१५ रोजी दिवाळीदरम्यान प्रदर्शित झाला. सचिन पिळगावकर, सुबोध भावे व शंकर महादेवन यांनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या. ४६ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 'इंडियन पॅनोरमा' विभागासाठी या चित्रपटाची निवड करण्यात आली.  
फिल्म रिव्ह्यू : कट्यार काळजात घुसली

 

ख्वाडा
मराठी चित्रपटांना अनोखी मेजवाणी देणारा ख्वाडा चित्रपट ठरला आहे, शेती विकून ख्वाडाची निर्मिती दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी केली होती. प्रदर्शिनाआधीच या चित्रपटानं दोन राष्ट्रीय पुरस्कार पटकावले. ख्वाडा हा सिनेमा शहरी प्रेक्षकांना अनोख्या ग्रामीण संस्कृतीत घेऊन जातो, शहरात राहणाऱ्या लोकांसाठी ग्रामीण भागात जाण्याची ही अनोखी मेजवानी आहे, सिनेमाचे दोन-अडीच तास सर्वांसाठी ग्रामीण भागात गेल्याची अनुभूती देतात.
फिल्म रिव्ह्यू : ख्वाडा
 

कोर्ट 
राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वोत्तम ठरलेला हा एक मराठी सिनेमा... सुवर्ण कमळ मिळवल्यानं प्रदर्शनाआधीच 'कोर्ट' या सिनेमाबद्दल मराठी प्रेक्षकांमध्ये या सिनेमाविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. आजच्या न्यायप्रक्रियेवर आणि कायदा सुव्यवस्थेवर भाष्य करणारा सिनेमा म्हणजे कोर्ट. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता चित्रपट 'कोर्ट'ची २०१५ साली भारताकडून मानाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. 
फिल्म रिव्ह्यू : कोर्ट 
 

किल्ला
एस्सेल विजनच्या किल्ला या सिनेमानं ब़ॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवलाय. प्रदर्शनानंतर केवळ तीन दिवसात या सिनेमानं सव्वा तीन कोटी इतका व्यवसाय केला. पहिल्याच आठवड्यात तब्बल 225 चित्रपटगृहांमध्ये हा सिनेमा झळकला. एव्हढंच नाहीतर प्रेक्षकाच्या वाढत्या मागणीमुळे या सिनेमाच्या शोमध्येही वाढ करण्यात आली.
फिल्म रिव्ह्यू : किल्ला
 

लोकमान्य एक युग पुरुष
शालेय पुस्तकांमधून आपण लहानपणी शिकलेल्या लोकमान्य टिळकांचे स्वातंत्र्यलढय़ातील योगदान या पलीकडे आपल्याला टिळकांची महती सांगणारा ‘लोकमान्य – एक युगपुरुष’ हा सिनेमा... वेशभूषा, संगीत, पार्श्वसंगीत, अभिनय अशा आघाड्यांवर यशस्वी ठरलेला ‘लोकमान्य – एक युगपुरुष’ प्रेक्षकांनाही चांगलाच भावला.
फिल्म रिव्ह्यू : लोकमान्य एक युग पुरुष
 

टाईमपास २
दगडू आणि प्राजूचा 'टाईमपास' नव्हे लव्हस्टोरी प्रेक्षकांना भावल्यानंतर 'टाईमपास २'मधून प्रियदर्शन जाधव आणि प्रिया बापट यांची जोडी 'टाईमपास २' या सिनेमातून प्रेक्षकांसमोर आली. या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये खूपच उत्सुकता दिसून येत होती.  'टाईमपास २'चा 'शाकाल' सुपरहीट ठरला.
फिल्म रिव्ह्यू : टाईमपास २
 

क्लासमेटस
आदित्य सरपोतदार दिग्दर्शित 'क्लासमेट्'स हा सिनेमा मराठी फिल्म इंडस्ट्रीतला एक बहुचर्चित आणि प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरणाऱ्यांपैकी एक... अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, सचित पाटील, सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ चांदेकर, सुशांत शेलार, सुयश टिळक आणि पल्लवी पाटील अशा मल्टीस्टारर 'क्लासमेटस्'ची कथाही प्रेक्षकांच्या मनाला स्पर्शून गेली.
फिल्म रिव्ह्यू : क्लासमेटस
 

मुंबई - पुणे - मुंबई २ 
मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी ही जोडी या चित्रपटाच्या निमित्तानं पुन्हा एकदा एकत्र दिसली. सतीश राजवाडेंच्या या सिनेमानं तरुणाईची मनं जिंकली. 
फिल्म रिव्ह्यू : मुंबई - पुणे - मुंबई २ 
 

राजवाडे अॅन्ड सन्स
पुणे शहरावर आणि नात्यांवर बेतलेल्या या सिनेमात अतुल कुलकर्णी, सचिन खेडेकर, मृणाल कुलकर्णी, सतीश आळेकर, ज्योती सुभाष, सिद्धार्थ मेनन, आलोक राजवाडे, मृण्मयी गोडबोले, कृतिका देव, पुर्णिमा मनोहर, राहुल मेहंदळे, अमित्रीयन पाटील, सुहासिनी धडफळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.  
फिल्म रिव्ह्यू : राजवाडे अॅन्ड सन्स
 

तू ही रे
सई ताम्हणकर, स्वप्निल जोशी आणि तेजस्विनी पंडित स्टारर 'तू ही रे' हा प्रेमाचा एक हटके त्रिकोण... संजय जाधव दिग्दर्शनाखाली दुनियादारी, प्यारवाली लव्हस्टोरी या सिनेमांची टीम पुन्हा एकदा एकत्र आली. 
फिल्म रिव्ह्यू : तू ही रे