लेखकाने मौन सोडलं, 'कटप्पाने बाहुबलीला का मारलं?'

"कटप्पाने बाहुबलीला का मारलं?", हा प्रश्न बाहुबली सिनेमा पाहिलेल्या प्रत्येकाला सतावतोय, यासाठी दक्षिणेतल्या एका न्यूज चॅनेलने या सिनेमाच्या लेखकालाचं बोलावून विचारलं, "कटप्पाने बाहुबलीला का मारलं?"

Updated: Aug 5, 2015, 10:29 PM IST
लेखकाने मौन सोडलं, 'कटप्पाने बाहुबलीला का मारलं?' title=

मुंबई : "कटप्पाने बाहुबलीला का मारलं?", हा प्रश्न बाहुबली सिनेमा पाहिलेल्या प्रत्येकाला सतावतोय, यासाठी दक्षिणेतल्या एका न्यूज चॅनेलने या सिनेमाच्या लेखकालाचं बोलावून विचारलं, "कटप्पाने बाहुबलीला का मारलं?"

या प्रश्नाचं उत्तर देतांना सिनेमाचे लेखक के व्ही विजयेंद्र प्रसाद म्हणाले, "बाहुबली सिनेमाच्या शेवटच्या दृश्यात एक व्यक्ती बाहुबलीवर तलवारीने वार करतो, पण यावरून तुम्ही असा अर्थ काढू शकत नाही की, कटप्पानेच बाहुबलीला मारलं?"

बाहुबली सिनेमाच्या शेवटच्या दृश्यात कटप्पा म्हणतो "शस्त्रांपेक्षाही घातक असतो तो विश्वासघात, तो विश्वासघात करणारा नीच मी आहे." 

यावरून लेखकाने आणखी एक कोडं निर्माण केलं आहे, 'विश्वासघात करणारा कटप्पा आहे, तरी बाहुबलीला मारणारा कटप्पा असेलच असं कशावरून", असे लेखकाने सांगितल्याने "कटप्पाने बाहुबलीला का मारलं?", या प्रश्नासह आणखी एक नवा प्रश्न पुढे आला आहे, "कटप्पानेच बाहुबलीला मारलं का?".

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.