‘सैराट’मधील त्या विहिरीचा फोटो होतोय व्हायरल

महाराष्ट्रभरात सध्या ‘सैराट’ चित्रपट सुस्साट धावतोय. बॉक्स ऑफिसवरही अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाने कमाईचे अनेक रेकॉर्ड मोडलेत.

Updated: May 3, 2016, 10:18 AM IST
‘सैराट’मधील त्या विहिरीचा फोटो होतोय व्हायरल title=

मुंबई : महाराष्ट्रभरात सध्या ‘सैराट’ चित्रपट सुस्साट धावतोय. या चित्रपटाचे चित्रीकरण सोलापूरच्या करमाळा परिसरात करण्यात आलेय. यात एक विहीरही दाखवण्यात आलीये. मात्र तुम्हाला ती विहिरीचे रहस्य तुम्हाला माहीत आहे का. 

टीव्ही, मीडिया, सोशल मीडिया येथे सर्वत्र ‘सैराट’चीच चर्चा सुरु आहे. या चित्रपटात जी विहीर दाखवण्यात आलीये त्या विहिरीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

या विहिरीत परश्या आणि आर्ची यांचे मनसोक्त डुंबतानाचे चित्रण चित्रपटात दिसते. मात्र व्हायरल झालेल्या या फोटोत ही विहीर कोरडीठाक पडलेली दिसतेय. यावरुन दुष्काळाच्या भीषण वास्तवाचे दर्शन घडतंय असं म्हटलं जातंय. मात्र हा फोटो कितपत खरा आहे याबाबत कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाहीये.