महानायक काढणार हरिवंशराय बच्चन यांची वेबसाईट

महानायक अमिताभ बच्चन यांचे वडिल दिवंगत कवी हरिवंशराय बच्चन यांच्या नावाने लवकरच वेबसाईट सुरू करणार आहेत. इंटरनेटच्या जालात हरिवंशराय बच्चन यांनी निर्माण केलेल्या कविता आणि इतर संग्रहांची संपूर्ण माहिती देणारे संकेतस्थळ असावे असं महानायक अमिताभ बच्चन यांन वाटतंय.

Updated: Apr 30, 2015, 09:08 PM IST
महानायक काढणार हरिवंशराय बच्चन यांची वेबसाईट title=

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांचे वडिल दिवंगत कवी हरिवंशराय बच्चन यांच्या नावाने लवकरच वेबसाईट सुरू करणार आहेत. इंटरनेटच्या जालात हरिवंशराय बच्चन यांनी निर्माण केलेल्या कविता आणि इतर संग्रहांची संपूर्ण माहिती देणारे संकेतस्थळ असावे असं महानायक अमिताभ बच्चन यांन वाटतंय.

वेबसाईटसाठी  हरिवंशराय बच्चन यांची कोणतीही माहिती अथवा छायाचित्रे कोणाकडे असल्यास ती आपल्यापर्यंत जरूर पोहोचवा, असे आवाहन अमिताभ बच्चन यांनी आपल्या चाहत्यांना केले आहे. 

अमिताभ ट्विटरवर म्हणतात की, मी माझ्या वडिलांबद्दलची सर्व माहिती, दुर्मिळ छायाचित्रे आणि इतर साहित्यांचा संग्रह करण्यास सुरूवात केली आहे. जर, तुमच्याजवळ हरिवंशराय यांच्याबद्दलच्या कोणत्याही आठवणी किंवा माहिती असल्यास ती thebachchanfamily@gmail.com या पत्त्यावर नक्की पाठवा."  

"हरिवंशराय बच्चन यांच्याबद्दलची अचूक आणि योग्य माहिती देणारे व्यापक संकेतस्थळ असावे अशी इच्छा आहे. कारण, हरिवंशराय यांच्या नावे अनेकांनी संकेतस्थळे सुरू केलीत पण, माहिती मात्र योग्य दिलेली नाही, असं ही अमिताभ यांनी म्हटलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.