'विराट कोहली सिंगल'

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्यामध्ये ब्रेक अप झाल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होत्या.

Updated: Feb 29, 2016, 03:34 PM IST
'विराट कोहली सिंगल' title=

मुंबई: विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्यामध्ये ब्रेक अप झाल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होत्या. पण या दोघांनीही कधीच याबाबत जाहीर वक्तव्य करणं टाळलं. 

पण विराट कोहलीच्या ब्रेक अपबाबत चक्क अभिनेता आयुषमान खुरानानंचं घोषणा केली आहे. पाकिस्तानविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो विराट कोहली.

या मॅचमध्ये सुरवातीला झालेल्या भारतीय बॅट्समनच्या पडझडीमुळे विराटनं सावध खेळ केला, आणि एक-एक रन काढत भारताचा विजय निश्चित केला. यावरूनच आयुषमाननं ट्विट केलं आहे. विराट कोहली सिंगल असल्यामुळेच तो सिंगल घेत आहे, असं आयुषमान ट्विटमध्ये म्हणाला आहे. 

आयुषमानचं 'ते' ट्विट