'महिलांचा सन्मान कपड्यांच्या लांबीवर अवलंबून नाही'

महिलांच्या कपड्यांवर आणि अंगप्रदर्शनावर अनेक चर्चा होताना दिसतात. याच विषयावर बोलताना अभिनेत्री विद्या बालन हिनं 'मुलींचा सन्मान त्यांच्या कपड्यांच्या लांबीकडे पाहून ठरवणं योग्य नसल्याचं' ठणकावून सांगितलंय. 

Updated: Feb 11, 2016, 04:16 PM IST
'महिलांचा सन्मान कपड्यांच्या लांबीवर अवलंबून नाही' title=

मुंबई : महिलांच्या कपड्यांवर आणि अंगप्रदर्शनावर अनेक चर्चा होताना दिसतात. याच विषयावर बोलताना अभिनेत्री विद्या बालन हिनं 'मुलींचा सन्मान त्यांच्या कपड्यांच्या लांबीकडे पाहून ठरवणं योग्य नसल्याचं' ठणकावून सांगितलंय. 

'यूथ फॉर युनिटी' कार्यक्रमात बोलताना विद्यानं महिलांच्या कपड्यांविषयी आपली ही भूमिका स्पष्टपणे मांडलीय. राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित अभिनेत्री विद्यानं यावेळी महिलांच्या छोडछाडीविषयी बोलताना म्हटलंय की, याविरुद्ध महिलांनी कुणालाही न घाबरता आपलं मत मांडलं पाहिजे.

लोकांच्या विचारधारेत बदल व्हायला हवा... मुलींना त्यांना जे घालायचंय ते घालण्याचं स्वातंत्र्य असायलाच हवं. त्यांचा सन्मान हा त्यांच्या कपड्यांवर अवलंबून नाही. त्यांना दिला जाणारा सन्मान हा त्यांच्या कपड्यांच्या लांबीवरून ठरवला जाऊ नये, असं विद्यानं यावेळी म्हटलंय. 

मुलींसाठीही त्यांनी मुलांप्रमाणेच आपल्या पायवर उभं राहणं खूप गरजेचं आहे. मुलांमध्ये आणि मुलींमध्ये भेदभाव करणं बंद व्हायला हवं, असंही तिनं म्हटलंय.