मुंबई : मयूर करंबळीकर दिग्दर्शित 'वज्र' या सिनेमात अभिनेत्री मानसी नाईकचा खास मुजरा प्रेक्षकांना बघायला मिळतोय.
मानसीचा हा मुजरा सोशल साईट्सवरही हिट झाला असून लाखो लाईक्स तिच्या या कातिल अदांना मिळाले आहेत.
चंद्रमोहन यांनी या सिनेमाला संगीत दिलंय. एकूणच नेहमीच आपल्या एकापेक्षा एक धमाकेदार नृत्याने प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या मानसीचा हा मुजरा वज्र सिनेमासाठी एक खास वैशिष्ट्य ठरलाय.