जयंती वाघधरे/ मुंबई : या आठवड्यात आपल्या भेटीला येतोय अभिनेत्री प्रियांका चोप्रा निर्मित, झी स्टुडिओप्रस्तूत, व्हेंटिलेटर. तब्बल १२५हून अधिक कलाकार असलेल्या या सिनेमात दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर ब-याच वर्षांनी अभिनय करताना दिसेल. हा सिनेमा म्हणजे हळूवार नात्यांचा पदर उलगडणार आहे.
स्वत: दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर असून जितेंद्र जोशी, सुकन्या कुलकर्णी, सतिश आळेकर, स्वाती चिटणीस अशी कलाकारांची भली मोठी फौज या सिनेमात पाहायला मिळणार आहे. कसा आहे व्हेंटिलेटर, हा सिनेमा तुमचे पैसे वसूल करणार का, काय आहे या सिनेमाची खऱी स्टोरी?
हल्लीच्या न्यूक्लिअर फॅमिली सिस्टीममध्ये, व्हाट्सअॅप आणि फेसबुकवर संवाद साधणारी मंडळी, एकत्र येउन एकमेकांशी संवाद साधणं कठिणच आहे. खरंतर हल्लीच्या काळात संपूर्ण कुटूंब एकत्र दोनच कारणांसाठी येतं, एक म्हणजे कुणाच्या लग्ना कार्यात किंवा कुणी देवा घरी गेलं तेव्हाच. काय होतं जेव्हा, काही कारणास्तव हे संपुर्ण परिवार एकत्र भेटतं. संपूर्ण कुटुंब, कुटुंबातले छोटे मोठे, काका, आत्या, दादा, आजी, आजोबा जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय मजा असते, काय धमाल उडते, या गमती जमतीतल्या बारीक सारीक गोष्टी अगदी सुंदर आणि तितक्याच मजेशीर पदध्तीनं मांडण्याचा प्रयत्न राजेश मापुसकर यांनी केलाय.
व्हेंटिलेटर या सिनेमाची कथा अगदी साधी आणि सरळ आहे. कोकणातली फॅमिली.. कामेरकर कुटुंबातले गज्जू काका सीरियस आहेत, व्हेंटिलेटर आहेत. गणेशोत्सव काही दिवसांवर असताना गज्जू काकांची प्रकृती गंभीर आहे. प्रकृती सिरीयस असल्यामुळे, संपुर्ण कामेरकर कुटुंबाला एकच चिंता सतावतेय. नाही नाही गज्जू काकांची नाही, तर ऐन गणेशोत्सवात काका गेले तर गणपती घरी बसवता येणार नाही, या गोष्टीची चिंता या संपूर्ण कामेरकर कुटुंबाला पडलीये. घरातला एखादा माणूस जेव्हा लास्ट स्टेजला असतो तेव्हा संपूर्ण परिवार एकत्र येतो, मग ती गावातली मंडळी असो किवा शहरातली, या सिनेमातही असंच काहीसं चित्र पाहायला मिळतं. आणि जेव्हा ही सगळी मंडळी एकत्र येतात तेव्हा काय धमाल उडते अशा काहीशा पार्श्वभूमीवरचा हा सिनेमा आहे.
दिग्दर्शक राजेश मापुसकर यांनी व्हेंटिलेटर या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. नात्यांचं महत्व, नात्यांची मजा, एकत्र येउन साधलेला संवाद, एकमेकांची सुख दु:ख जाणून घेणं, या छोट्या छोट्या गोष्टींमधून मिळणारा आनंद कॅमेरात टिपण्याचा प्रयत्न दिग्दर्शक राजेश मापुसकर यांनी केलाय. एका पेक्षा एक कॅरेक्टर्स या सिनेमात रंगवण्याची कला त्यांना खरंच जमलीये. सिनेमाला संगीत दिलंय संगीतकार रोहन रोहन या जोडनं. सिनेमात गाणी नाहीत, पण सिनेमाच्या थीम प्रमाणे संगीतबद्ध केलंलं यारेया सारे हे गाणं श्रवणीय वाटतं.
आशुतोष गोवारिकर अनेक वर्षांनी या सिनेमाच्या निमित्तानं अभिनय करताना दिसेल. आशुतोष गोवारिकर यांचा बिगस्क्रीनवरचा हा कमबॅक एकदम फीट बसलाय.. राजा कामेरकर ही व्यक्तिरेखा त्यांनी चोख बजावलीये., इंटरवलच्या आधी आशुतोष गोवारिकर तर इंटरवलच्या नंतर जितेंद्र जोशी अशी जबपदस्त बॅटींग या नटांनी केलीये. अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि बमन इराणी या सिनेमात सरप्राइज एलिमेन्ट्स म्हणून पहायला मिळतात.
व्हेंटिलेटर हा एक कंप्लीट फॅमिलीमय या सिनेमात इमोशन्स आहेत. ड्रामा आहे, लाईट ह्युमर आहे, नात्यांची जाण आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्रा निर्माती म्हणून हा पहिलाच मराठी सिनेमा आहे. काही वर्षांपूर्वीच प्रियांका चोप्राचे बाबा वारले. खऱं तर हा सिनेमा तिच्या कडून तिच्या बाबांना ट्रिब्यूट आहे. या सिनेमासाठी तिनं एक मराठी गाणं ही म्हटलंय, जे ऐकून बाबा मुलांच्या नात्याची नव्यानं ओळख होते. आजवर अनेक सिनेमांमध्ये आपण आईची ममता, तिची माया सतत व्यक्त झालीये. मात्र या सिनेमा वडिलांचं प्रेम, त्यांची माया, बाबा मुलांच्या नात्याची जाण नव्यानं अनुभवायला मिळतेय.
तेव्हा व्हेंटिलेटर या सिनेमातले हे सगळए फॅक्टर्स पाहता या सिनेमाला 3.5 स्टार्स मिळत आहेत.