अमेरिकेतही सई आणि प्रियाच्या वजनदारला मोठा प्रतिसाद

सई ताम्हणकर आणि प्रिया बापट स्टारर वजनदार या सिनेमाला महाराष्ट्रासोबतच भारतबाहेरही मोठी पसंती मिळतेय. 

Updated: Dec 3, 2016, 08:06 AM IST
अमेरिकेतही सई आणि प्रियाच्या वजनदारला मोठा प्रतिसाद title=

मुंबई : सई ताम्हणकर आणि प्रिया बापट स्टारर वजनदार या सिनेमाला महाराष्ट्रासोबतच भारतबाहेरही मोठी पसंती मिळतेय. 

वजनदार या सिनेमाला अमेरिकेतही मोठा प्रेक्षकवर्ग मिळतोय. राज्यात या सिनेमाला लोकांनी चांगली पसंती दर्शवली. आता अमेरिकेतही असाच प्रतिसाद या सिनेमाला मिळतोय. 

अमेरिकेतील बे एरिया आणि शिकागो येथे हा सिनेमा दाखवण्यात आला होता. येथील प्रेक्षकांना हा सिनेमा आवडल्याने डेनवर, डेट्रॉइट, सियाटल, लॉस एंजेलिस, कोलंबस, हडसन आणि डलास येथेही या शोचे आयोजन करण्यात आलेय. 11 नोव्हेंबरला हा सिनेमा राज्यात प्रदर्शित झाला.