लग्नाच्या रजिस्ट्रेशननंतर निकाह करणार उर्मिला मातोंडकर

 मुस्लिम पद्धतीने उर्मिला निकाह करणार आहे. 

Updated: Mar 4, 2016, 04:22 PM IST
लग्नाच्या रजिस्ट्रेशननंतर निकाह करणार उर्मिला मातोंडकर title=

मुंबई :  प्रीती झिंटानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने आपल्या पेक्षा नऊ वर्ष लहान असलेल्या बिझनेसमन आणि मॉडेल मोहसिन अख्तर मीरशी लग्न करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. 

इंग्रजी वेबसाइट 'पिंकव्हिला'ने दिलेल्या बातमीनुसार हिंदू परंपरेनुसार पहिल्यांदा लग्न झाले आहे.

पण आता या लग्नाची रजिस्ट्रेशन होणार आहे. त्यानंतर मुस्लिम पद्धतीने उर्मिला निकाह करणार आहे. 

यानंतर उर्मिला लवकरच एक रिसेप्शन पार्टी देणार असून त्यात बॉलीवूड इंडस्ट्रीतील सर्व तारे उपस्थित राहणार आहेत.

 लग्न खूप साधेपणाने झाले. लग्नाबद्दल कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती. यात दोन्ही कुटुंबातील काही ठराविक जण आणि काही मित्र उपस्थित होते.