रामगोपाल वर्मा यांचं होळीवर वादग्रस्त ट्वीट

होळी हा वर्षातला एकमेव असा दिवस आहे, जेव्हा स्त्री आणि पुरुष एकमेकांना ओल्या कपड्यात पाहू शकतात आणि स्पर्श करु शकतात, असं टवीट.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 13, 2017, 10:28 PM IST
रामगोपाल वर्मा यांचं होळीवर वादग्रस्त ट्वीट title=

मुंबई : होळी हा वर्षातला एकमेव असा दिवस आहे, जेव्हा स्त्री आणि पुरुष एकमेकांना ओल्या कपड्यात पाहू शकतात आणि स्पर्श करु शकतात, असं टवीट महिला दिनी आक्षेपार्ह ट्विट करणारा दिग्दर्शक राम गोपाल वर्माने पुन्हा एकदा होळीनिमित्त वादग्रस्त ट्विट केले आहे. 

 'होळी हा वर्षातला एकमेव असा दिवस आहे, जेव्हा स्त्री आणि पुरुष एकमेकांना ओल्या कपड्यात पाहू शकतात आणि स्पर्श करु शकतात. मला माहित नाही, कोणत्या देवाने कोणत्या राक्षसाचा वध केला, पण असे मादक क्षण निर्माण केल्याबद्दल मी राक्षसांचे आभार मानतो. १२० कोटी जनतेपैकी एकाला तरी होळी साजरा करण्याचे कारण माहित आहे का, मला शंका वाटते. पण सगळे भांग पितात, मेरा भारत महान', असं रामगोपाल वर्माने टवीट केलं आहे.

राम गोपाल वर्माने पुन्हा एकदा वादग्रस्त ट्विट करत वाद ओढवून घेतला आहे. यापूर्वी राम गोपाल वर्माने महिला दिनी ट्विट करताना महिलांनी सनी लिऑनप्रमाणे पुरुषांना आनंद दिला पाहिजे, असे आक्षेपार्ह ट्विट केले होते.