मराठमोळी राधिका आपटे हिला 'ट्रिबेका'चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे हिला न्यूयॉर्कमधील ट्रिबेका फिल्म फेस्टिव्हलमध्ये आंतरराष्ट्रीय श्रेणीतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. 

Updated: Apr 22, 2016, 06:33 PM IST
मराठमोळी राधिका आपटे हिला 'ट्रिबेका'चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार title=

मुंबई : मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे हिला न्यूयॉर्कमधील ट्रिबेका फिल्म फेस्टिव्हलमध्ये आंतरराष्ट्रीय श्रेणीतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेता रितेश देशमुख, अर्जुन कपूर यांनी राधिकाचे ट्विट करुन अभिनंदन केलेय.

शोर इन दि सिटी, मांझी: द माऊंटन मॅन, बदलापूर आदी सिनेमे आणि अहल्या सारख्या शॉर्टफिल्ममधील लक्षवेधी अभिनय राधिकाने करुन सर्वांचे लक्ष वेधले होते. 'मॅडली' या शॉर्टफिल्ममधील भूमिकेसाठी तिला हा पुरस्कार मिळालाय.

सहा दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या शॉर्ट फिल्मच्या 'मॅडली' या २० मिनिटांच्या भागात राधिका झळकली आहे. मात्र यातील भूमिकेसाठी तिचे खूप कौतुक झालेय. आंतरराष्ट्रीय स्तरावरील फिल्म फेस्टिव्हलमध्येही तिची दखल घेतली गेली.

'ट्रिबेका' फिल्म फेस्टिव्हलमध्ये एखाद्या भारतीय अभिनेत्रीने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळण्याची ही पहिली वेळ आहे. या फिल्म फेस्टिव्हलसाठी जगभरातून हजारो फिल्म्स पाठवल्या जातात. येथे परीक्षण आंतरराष्ट्रीय स्तरावरील दिग्गज जुरी करतात.