पाहा, आत्ताच 'म्हातारी' ऐश्वर्या कशी दिसते!

नवी दिल्ली : ही बातमी वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ही आनंदाची बातमी आहे. 

Updated: Mar 3, 2016, 05:32 PM IST
पाहा, आत्ताच 'म्हातारी' ऐश्वर्या कशी दिसते!  title=

नवी दिल्ली : ही बातमी वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ही आनंदाची बातमी आहे. सध्या ऐश्वर्या राय तिच्या आगामी 'सरबजीत' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये दिल्लीत व्यस्त आहे. यात ती सरबजीतची बहीण दलबीर कौरची भूमिका करत आहे. पाकिस्तानी तुरुंगात भारतीय गुप्तचर असल्याचा संशयावरुन सरबजीतचा मृत्यू झाला होता.

टाइम्स ऑफ इंडियातील एका वृत्तानुसार ऐश्वर्या काहीच दिवसांपूर्वी दिल्लीतील इंडिया गेटच्या परिसरात शूटिंग करत होती. तेव्हा अनेकांनी तिच्याभोवती घोळका केला. यातील काही बघ्यांना ऐश्वर्याला पाहून आश्चर्य वाटले. 'ही ऐश्वर्या राय इतकी म्हातारी का दिसतेय?' असा प्रश्न ते एकमेकांत विचारत होते.

ही खरं तर ऐश्वर्याला ती साकारत असलेल्या पात्रासाठी शाबासकी म्हणायला हवी... कारण, दलबीरच्या भूमिकेसाठी तिचं उतारवयीन दिसणं गरजेच होतं... मेकअपमुळे ऐश्वर्या जर ती म्हातारी दिसत असेल, तर तिच्यासाठी हा मोठा दिलासा आहे. आता ही 'म्हातारी' ऐश्वर्या कशी दिसते याचीच उत्सुकता तुम्हालाही असेलच...