लग्नानंतर तीनच महिन्यांत अभिनेत्यानं केली आत्महत्या

तमिळ टेलिव्हिजनचा प्रसिद्ध अभिनेता साई प्रशांतनं रविवारी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केलीय. 

Updated: Mar 15, 2016, 11:43 AM IST
लग्नानंतर तीनच महिन्यांत अभिनेत्यानं केली आत्महत्या  title=

मुंबई : तमिळ टेलिव्हिजनचा प्रसिद्ध अभिनेता साई प्रशांतनं रविवारी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केलीय. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांतनं प्यायलेल्या पेय पदार्थामध्ये विष होतं... यामुळे त्याचा मृत्यू झालाय. 

साई प्रशांत यानं आत्महत्या का केली यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु, एकाकीपणा असह्य झाल्यानं त्यानं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जातंय. सध्या, पोलिसांनी साई प्रशांतचं शव पोस्टमॉर्टेमसाठी पाठवलंय. 

छोट्या पडद्यावर दिसणारा प्रशांत आपल्या खाजगी आयुष्यात अस्थिर होता. त्याचं पहिलं लग्न संपुष्टात आलं होतं. त्यानंतर त्यानं तीन महिन्यांपूर्वीच दुसरा विवाह केला होता. 

अन्नामलाई, सेल्वी, अरासी यांसारखा डेली सोपमध्ये प्रशांतनं काम केलं होतं. तर नेरम तेगीडी आणि वाडाकरी यांसारख्या काही तमिळ सिनेमांमध्येही तो दिसला होता.