तापसी पन्नूचा हा टॅटू तरुणींमध्ये लोकप्रिय

पिंक चित्रपटात आपल्या जबरदस्त अभिनयाने तापसी पन्नूने प्रेक्षकांवर छाप पाडलीये. 

Updated: Sep 25, 2016, 08:23 AM IST
तापसी पन्नूचा हा टॅटू तरुणींमध्ये लोकप्रिय title=

मुंबई : पिंक चित्रपटात आपल्या जबरदस्त अभिनयाने तापसी पन्नूने प्रेक्षकांवर छाप पाडलीये. 

या चित्रपटात तिने बिनधास्त मुलीची भूमिका बजावलीये. यात तापसीच्या कॉलर बोनवर असलेला टॅटू सध्या तरुणींमध्ये लोकप्रिय झालाय.

तापसी पन्नूच्या या टॅटूमध्ये पक्षी उडतानाच्या चार पायऱ्या आहेत. पक्ष्याला मोठी भरारी घेत उंच उडायचे आणि त्यासाठी पक्ष्याचे प्रयत्न सुरु आहेत. तशाच प्रकारे एका स्वतंत्र मुलीला जगात आपले अस्तित्व निर्माण करायचे आहे अशी भूमिका तापसीची या चित्रपटात आहे.