सुशांत-अंकिता वर्षाअखेरीस लग्नबंधनात अडकणार

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि त्याची प्रेयसी अंकिता लोखंडे या वर्षाच्या अखेरीस लग्नबंधनात अडकतायत. 

Updated: Jan 11, 2016, 11:08 AM IST
सुशांत-अंकिता वर्षाअखेरीस लग्नबंधनात अडकणार title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि त्याची प्रेयसी अंकिता लोखंडे या वर्षाच्या अखेरीस लग्नबंधनात अडकतायत. 

झी टीव्हीवरील पवित्र रिश्ता या मालिकेतून सुशांत आणि अंकिता यांची लव्हस्टोरी सुरु झाली होती. डिसेंबरमध्ये हे दोघेही विवाहबंधनात अडकतायत. काही दिवसांपूर्वीच या दोघांचे गोव्या समुद्रकिनाऱ्यावर य़ा दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 

भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित 'धोनी: द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटातून सुशांत पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. पवित्र रिश्तामधून बाहेर पडल्यानंतर काय पोचे या चित्रपटाद्वारे त्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर शुद्ध देसी रोमान्स, पीके, डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी या चित्रपटातून त्याने अभिनयाचा जलवा दाखवला.