शाहरूखच्या सुरक्षेत अचानक वाढ

बॉलिवूडचा बादशहा अभिनेता शाहरुख खान यांच्या सुरक्षेत अचानक वाढ करण्यात आली आहे. 'चेन्नई एक्स्प्रेस' या सिनेमाचा निर्माता करीन मोरानी याला अंडरवर्ल्डकडून धमकी मिळाली आणि यानंतर पोलिसांनी शाहरुख खानच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

Updated: Aug 26, 2014, 05:22 PM IST
शाहरूखच्या सुरक्षेत अचानक वाढ  title=

मुंबई : बॉलिवूडचा बादशहा अभिनेता शाहरुख खान यांच्या सुरक्षेत अचानक वाढ करण्यात आली आहे. 'चेन्नई एक्स्प्रेस' या सिनेमाचा निर्माता करीन मोरानी याला अंडरवर्ल्डकडून धमकी मिळाली आणि यानंतर पोलिसांनी शाहरुख खानच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

 'चेन्नई एक्स्प्रेस'चे निर्माते आणि एका इव्हेंट कंपनीचे मालक करीम मोरानी यांनी काल अंडरवर्ल्डकडून धमकी मिळाल्याची तक्रार पोलिसात केली. तसेच काही बाईकस्वारांनी गोळीबार केल्याचंही तक्रारीत नमूद आहे. 

अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीच्या गँगने घाबरवण्यासाठी हवेत गोळीबार केला असल्याचं सांगण्यात येतंय.

करीम मोरानी आणि शाहरुख खानचे मैत्रीचे संबंध आहेत. तसेच आगामी 'हॅप्पी न्यू इयर' चित्रपटाचीही निर्मिती त्यांची आहे. त्यामुळे शाहरुख आणि बॉलिवूडशी संबंधित काही कलाकारांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.