स्पेशल 'भिकाऱ्या'नं ऋतिकला केलं हैराण...

गुरुवारी हृतिक बिझी होता तो त्याच्या आगामी सिनेमाच्या शूटींगमध्ये... आणि अचानक या सेटवर एक भिकारी दाखल झाला... आणि त्यानं हृतिकला छळायला सुरुवात केली... बरं... या भिकाऱ्याला इथून कुणीही हाकललंही नाही...

Updated: Jun 28, 2014, 01:22 PM IST
स्पेशल 'भिकाऱ्या'नं ऋतिकला केलं हैराण...  title=

मुंबई : गुरुवारी हृतिक बिझी होता तो त्याच्या आगामी सिनेमाच्या शूटींगमध्ये... आणि अचानक या सेटवर एक भिकारी दाखल झाला... आणि त्यानं हृतिकला छळायला सुरुवात केली... बरं... या भिकाऱ्याला इथून कुणीही हाकललंही नाही...

अभिनेता हृतिक रोशन मला जेव्हापर्यंत भीक देत नाही तोपर्यंत आपण इथून हलणार नाही, अशी भूमिकाच या भिकाऱ्यानं सर्वांसमोर मांडली.... यामुळे हृतिक मात्र चांगलाच वैतागला. त्यानं सिक्युरिटीला सांगून त्या भिकाऱ्याला सेटवरुन बाहेर काढण्यास सांगितलं.

पण, हृतिकच्या बोलण्याकडे कुणी लक्षच देत नव्हतं... ना त्या भिकाऱ्याला हकलत होतं... त्यानंतर हृतिकनं सेटवरच्या इतर मंडळींकडे नजर टाकली तेव्हा सगळे जण गालातल्या गालात हसताना त्याला दिसले... तेव्हा कुछ तो झोल आहे, हे ऋतिकच्या लक्षात आलं... नंतर ऋतिकच्या लक्षात आलं की ती 'बाबू जासूस'च्या भूमिकेतली विद्या बालन आहे... आणि मग काय... हसून हसून त्याचं सगळ्यांचंच पोट दुखायला लागलं... 

हाच, प्रसंग ऋतिकनं सोशल वेबसाईट ट्विटरच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांपर्यंत पोहचवलाय. 'विद्या आणि सगळ्यांनी मिळून मला मूर्खात काढलंय... हा भिकारी नसून विदया आहे' असं त्यानं म्हटलंय. 

विद्याचा आगामी चित्रपट 'बॉबी जासूस' मध्ये तिनं एका भिकाऱ्याच्या वेशाषतही दिसलीय. तोच वेश धारण करुन विद्या ऋतिकच्या चित्रपटाच्या सेटवर पोहोचली होती. 

'बॉबी जासूस'ची प्रोड्युसर दिया मिर्झानं या स्पेशल भिकाऱ्यासोबत हृतिकचा एक फोटो काढून त्यानं तो ट्विटरवर शेअर केलाय... 'आज बॉबीने खूप मस्ती केली, उद्या बॉबी बडोद्यात असेल' असं ट्विट तिनं केलंय. 

Aaj #Bobby ne kaafi masti ki! Kal bobby Baroda mein hogi ;) pic.twitter.com/KreFExvbHL

— Dia Mirza (@deespeak) June 26, 2014

विद्या 'बॉबी जासूस'मध्ये एका गुप्तचराच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे ती या चित्रपटात विविध वेशांत दिसतेय. चित्रपटचे प्रमोशनही विद्या याच वेगवेगळ्या वेशांत करतेय. या चित्रपटाचे प्रोडक्शन 'बॉर्न फ्री इंटरटेन्मेट' करत असून दिग्दर्शक करतोय समर शेख. येत्या 4 जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.