अभिनेता सोनू सूदच्या वडिलांचे निधन, सोनू हादरला

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याचे पिता शक्तिपाल सूद यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. 

Updated: Feb 8, 2016, 04:52 PM IST
 अभिनेता सोनू सूदच्या वडिलांचे निधन, सोनू हादरला title=

मोगा (पंजाब) : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याचे पिता शक्तिपाल सूद यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. 

काल रात्री हृदयविकाराचा झटका आला त्यात त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येत असताना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. ही घटना घडली तेव्हा सोनू घरी नव्हता. या घटनेची माहिती मिळाल्यावर सोनू सूदला दुःख अनावर झाले. तो अजूनही स्वतःला सांभाळू शकला नाही. 

शक्तिपाल सूद हे कपड्याचे व्यापारी होते. त्यांचे पंजाबमधील मोगा येथे एक शो रूम आहे. सोनू गेल्या शनिवारी सेलिब्रिटी क्रिकेट लीगची मॅच खेळण्यासाठी चंडीगडला आला होता. त्यावेळी रविवारी तो घरी आला होता. 

सोनू सूद याच्या आईचे काही वर्षापूर्वीच निधन झाले आहे. त्याला दोन बहिणी आहे, त्यातील एकीचे लग्न होऊन ती अमेरिकेतत आहे तर दुसरी मोगामध्ये राहायला आहे. त्यांच्या पित्यांवर मंगळवारी अंत्यसंस्कार होणार आहेत.