पुन्हा एकदा बॉयफ्रेंडसोबत दिसली अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा

सोनाक्षी सिन्हा पुन्हा एकदा दिसली बॉयफ्रेंडसोबत

Updated: Nov 6, 2016, 08:50 PM IST
पुन्हा एकदा बॉयफ्रेंडसोबत दिसली अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा title=

मुंबई : दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा पुन्हा एकदा तिच्या बॉयफ्रेंडसोबत दिसली. सोनाक्षी मुंबईतील एका सब-अर्बन भागात एका रेस्टोरेंटमधून बाहेर येतांना दिसली. ब्लॅक ड्रेसमध्ये ती हॉटेलमध्ये पोहोचली होती. पण कॅमेरे दिसल्यानंतर तिने तिथे न थांबणं पसंत केलं.

सोनाक्षी आणि बंटी या दोघांना एका नाईट क्लबच्या बाहेर पाहण्यात आलं. क्लबमधून बाहेर पडताच बंटी सचदेवने तिला एक वस्तू दिली. ती काय होती याबाबत माहिती नाही. पण त्यानंतर ती तेथून निघून गेली.

सोनाक्षी 2012 पासून बंटीसोबत रिलेशनमध्ये आहे. सोनाक्षी किंवा बंटी या दोघांनीही हे नातं कधी मान्य नाही केलं. याबाबत त्यांनी बोलणं टाळलं. बंटी हा सुष्मिता सेनचा एक्स-ब्वॉयफ्रेंड आहे. सोहल खानची पत्नी सीमा सचदेव हिचा तो भाऊ आहे.